Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

कॅप्टन्सी टास्कमध्ये शेवटच्या क्षणी गेम चेंज; 'Bigg Boss 19'च्या घरात आठवडाभर चालणार 'या' सदस्याची सत्ता, नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss 19 New Captain : 'बिग बॉस 19'च्या घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. ज्यामध्ये शेवटच्या क्षणी गेम चेंज झालेला पाहायला मिळाला.

Shreya Maskar

सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो सध्या खूप गाजत आहे.

घराचा नवा कॅप्टन पुन्हा फरहाना बनली असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत.

कॅप्टन्सी टास्कमध्ये बसीर अली आणि प्रणित मोरे यांच्यात वाद झाला.

सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस 19' मध्ये (Bigg Boss 19) अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. ज्यात घरातील सदस्य भांडताना दिसत आहेत. ज्या सदस्याला अयशस्वी कॅप्टन म्हणून हिणवले गेले. तोच सदस्य पुन्हा एकदा कॅप्टन झाला आहे. कॅप्टन्सी टास्क दरम्यान काय घडले, जाणून घेऊयात.

बिग बॉसच्या फॅन पेजकडून मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क रद्द करण्यात आला आहे. घरातील सध्याची कॅप्टन फरहानाच पुढच्या आठवड्याचीही कॅप्टन असणार आहे. फरहाना ही या सीझनची पहिली स्पर्धक आहे, जी सलग दोनदा कॅप्टन्सी सांभाळत आहे. फरहाना पुन्हा कॅप्टन झाल्यामुळे घरातील काही सदस्या नाराज पाहायला मिळत आहे.

कॅप्टन्सी टास्क असा होता की, घरातील सदस्यांना त्यांच्या नावाचे छाटे डायनासोर बीबी डायनासोरपासून सुरक्षित ठेवायचे होते. जेणेकरून ते कॅप्टन्सी जिंकू शकतील. या खेळात घरातील सदस्य पिंजऱ्यात बंद असताना दिसतात. तर कॅप्टन्सी टास्क दरम्यान यावेळी बसीर अली आणि प्रणित मोरे यांच्यात वाद होताना दिसतो. तसेच अभिषेक बजाज आणि शहबाजमध्ये देखील वाद होतो. मात्र कॅप्टन्सी टास्कमध्ये असे काही तरी होत की कॅप्टन्सी टास्क रद्द केला जातो.

'बिग बॉस 19' च्या घरातून 8 सदस्य नॉमिनेट झाले आहे. नॉमिनेट सदस्यांची नावे खालीलप्रमाणे-

  • अमाल मलिक

  • नेहल चुडासमा

  • कुनिका सदानंद

  • अशनूर कौर

  • नीलम गिरी

  • प्रणित मोरे

  • तान्या मित्तल

  • झीशान कादरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण चौधरी कुटुंबीयांसह मगर कुटुंबीयांवर सुद्धा गुन्हा दाखल

Face Care: फेसवॉशऐवजी 'या' घरगुती सामग्रीने चेहरा धुतला तर मिळेल नॅचरली ग्लोईंग आणि स्मूद फेस

Kia India 2026: लोकांच्या पसंतीस उतरलेली New Kia Seltos कारमध्ये मोठे बदल, जाणून घ्या नवे फिचर्स

बारामतीत मोठा राडा; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला बाबासाहेबांचा फोटो डावलला; 'वंचित'कडून नगराध्यक्षांवर शाईफेक

Home Cleaning Tips: घरात लादी पुसताना पाण्यात टाका मीठाचे खडे, नकारात्मक उर्जा होईल दूर

SCROLL FOR NEXT