Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

"ये इंसान मेरी जिंदगी में पहले क्यों नहीं आया?" 'Bigg Boss 19'च्या घरात अमाल मलिक रमला आपल्या एकतर्फी प्रेमाच्या आठवणीत

Amaal Mallik One Side Love : गायक अमाल मलिक सध्या 'बिग बॉस 19'चे घर गाजवताना दिसत आहे. तो आपल्या एकतर्फी प्रेमाच्या आठवणीत रमलेला पाहायला मिळाला.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'च्या घरात अमाल मलिकला आपल्या एकतर्फी प्रेमाची आठवण आली आहे.

अमाल घरी एकटाच स्वतःशी बोलताना दिसत आहे.

शोमध्ये अमाल मलिक आणि तान्या मित्तलची मैत्री वाढताना दिसत आहे.

'बिग बॉस 19' मध्ये (Bigg Boss 19) रोज नवीन एक ट्विस्ट पाहायला मिळतो. शो आता रंजक वळणावर आला आहे. एकीकडे अमाल मलिक आणि तान्या मित्तलची मैत्री वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे अमाल मलिक त्यांच्या एकतर्फी प्रेमाच्या आठवणीत रमलेला दिसत आहे. अमाल मलिकला (Amaal Mallik One Side Love ) बिग बॉसच्या घरात गेल्यापासून अनेक वेळा त्यांच्या एकतर्फी प्रेमाची आठवण झाली आहे. नुकताच बिग बॉसने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अमाल मलिक एकाट स्वतःशी बोलताना दिसत आहे.

अमाल मलिक नेमकं काय म्हणाला?

"आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो. जेव्हा आपल्याला उदास वाटते. नैराश्य येते. आपण जगावर नाराज होतो. असे वाटते कोणाशी काहीच नाते ठेवू नये आणि मग अशी कोण तरी व्यक्ती येते. जी तुमच्या मनात घर करून राहते. ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आता येणार होती तर आधी का नाही आली? (ये इंसान मेरी जिंदगी में पहले क्यों नहीं आया) आधी भेटली असती तर जास्त वेळ असता. जास्त प्रेम केले असते तिच्यावर...

अशी एक व्यक्ती नक्कीच आहे माझ्या आयुष्यात जिच्यामुळे माझ्या हृदयाची धडधड वाढते. जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीची आठवण येते तेव्हा तेव्हा नवीन गाणे सुचते. सध्या तर हे प्रेम एकतर्फी आहे. पण आशा आहे की, जेव्हा मी बाहेर जाईन तेव्हा हे प्रेम दोघांकडून असेल. तोपर्यंत ऐकत रहा बीबी रेडिओ क्यों आज तक तू मुझसे दूर था..."

प्रेक्षकांना, घरातील सदस्यांना सर्वांनाच अमाल मलिकच्या आयुष्यातील मिस्ट्री गर्ल कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. तर दुसरीकडे अमाल मलिकच्या आयुष्यात दुसरी मुलगी असल्यामुळे तान्या मित्तल नाराज, उदास असल्याच पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : हनुमान खोटा देव, आपण ख्रिश्चन आहोत; डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेत्याने तोडले अकलेचे तारे

तुमच्या बँकेकडून ऑनलाईन चेकबुक कसं ऑर्डर करायचं?

Parbhani : परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर; रामपुरी गावात घरामध्ये पाणी, ग्रामस्थांचे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचे ८ मोठे निर्णय, मुंबई-नाशिक आणि सोलापूरला होणार फायदा; मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीला मिळाली नवी जोडी, भूषण–केतकीची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री ‘तू माझा किनारा’ मध्ये दिसणार

SCROLL FOR NEXT