Ranbir Kapoor : रणबीर कपूर अडचणीत, आर्यन खानच्या वेब सीरिजमधील 'त्या' सीनमुळे कारवाईची मागणी

The Bads Of Bollywood-Ranbir Kapoor : आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील एका सीनमुळे रणबीर कपूर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.
The Bads Of Bollywood-Ranbir Kapoor
Ranbir KapoorSAAM TV
Published On
Summary

18 सप्टेंबरला आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिज रिलीज झाली.

वेब सीरिजमध्ये ई-सिगारेट ओढल्यामुळे रणबीर कपूरवर तक्रार दाखल करण्यात आला आहे.

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून आर्यन खानने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

शाहरुख खानचा लेक आर्यन खानची (Aryan Khan) सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. 18 सप्टेंबरला त्याची पहिली वेब सीरिज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' (The Bads Of Bollywood) रिलीज झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आर्यन खानने दिग्दर्शक म्हणून 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' मधून पदार्पण केले. मात्र एकीकडे आर्यन खानचे कौतुक होत असताना दुसरीकडे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अडचणीत आला आहे. त्याने देखील 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' मध्ये काम केले आहे.

'बॅड्स ऑफ बॉलिवूड' मधील रणबीर कपूरच्या एका सीनवर विरोध दर्शवण्यात आला आहे. चित्रपटात एका सीनमध्ये रणबीर कपूर ई-सिगारेट ओढताना दिसत आहे. मात्र त्या सीन दरम्यान कोणताही डिस्क्लेमर देण्यात आला नाही. अशी तक्रार विनय जोशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली. डिस्क्लेमर न दिल्यामुळे 2019 चा इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यासंबंधित अभिनेता रणबीर कपूर आणि 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' च्या निर्मात्यांवर तक्रार दाखल करण्यात आला आहे. एनएचआरसीने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये तरुण पिढीवर नकारात्मक परिणाम करू शकणाऱ्या अशा कंटेंटवर त्वरित बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई पोलिस आयुक्तांना इलेक्ट्रॉनिक सिगारेट विकणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यासही सांगण्यात आले आहे.

स्टारकास्ट

'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये बॉलिवूडचे खूप तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. यात बॉबी देओल, मोना सिंह, लक्ष्य, राघव जुयाल हे मुख्य कलाकार पाहायला मिळत आहेत. तसेच रणबीर कपूर, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान,करण जोहर, सारा अली खान या कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.

The Bads Of Bollywood-Ranbir Kapoor
Dashavatar Collection : 'दशावतार'ची उंच भरारी, दिलीप प्रभावळकर यांच्या चित्रपटानं पार केला तब्बल 'इतक्या' कोटींचा टप्पा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com