
आरोग्य म्हणजे बाहेरून दिसणारा फिटनेस अशीच कल्पना करतो. यामध्ये जो नियमित व्यायाम करतो, जंक फूड टाळतो, धूम्रपान आणि दारूला हात लावत नाही, तो नक्कीच निरोगी असेल असं वाटतं. पण कधी कधी शरीराच्या आत घडणाऱ्या गोष्टी वेगळीच सांगतात.
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शगुन अग्रवाल यांनी इंस्टाग्रामवर एक धक्कादायक घटना शेअर केली. यामध्ये २९ वर्षीय रोहन नावाचा २९ वर्षीय तरुण, जो सगळ्या आरोग्याच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत होता तो जिममध्ये व्यायाम करताना अचानक कोसळला. त्याला हृदयाची समस्या असल्याचं निदान करण्यात आलं.
डॉ. अग्रवाल यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “रोहन २९ वर्षांचा होता. तो आयटी क्षेत्रात काम करत होता. आठवड्यातील सहा दिवस जिम, ना धूम्रपान, ना दारू, ना जंक फूड अशी त्याची शिस्तबद्ध जीवनशैली होती.”
रोहनच्या इंस्टाग्रामवर सतत जिममधील फोटो आणि व्हिडिओ असायचे. यावेळी तो ‘नो एक्सक्यूजेस’ अशा कॅप्शनसह फोटो शेअर करायचा. आई कधी कधी म्हणायची, “बेटा, जरा कमी कर, विश्रांतीही घे,” तर रोहन हसत म्हणायचा, “माँ, मी इथल्या सगळ्यात फिट आहे!”
पण एका मंगळवारी संध्याकाळी, इन्क्लाइन डंबेल प्रेस करताना पहिला सेट, दुसरा सेट, तिसरा सेट… आणि मध्येच तो पडला. यावेळी वजनं जमिनीवर आदळली आणि तोही. ना किंकाळी, ना इशारा, ना दुसरी संधी. काही लोकांना सुरुवातीला हे गंमत आहे असं वाटलं. मात्र रोहनचा श्वास सुरु नव्हता. सीपीआर, अॅम्ब्युलन्स… आणि त्याचे आई-वडील पोहोचेपर्यंत सगळं संपलं होतं.
डॉ. अग्रवाल यांच्या मते, रोहनचा मृत्यू ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ मुळे झाला. यामागे ‘हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी’ (HCM) ही स्थिती कारणीभूत होती. यामध्ये हृदयाच्या स्नायूंची जाडी असामान्यरीत्या वाढते आणि ते वेळेवर ओळखलं गेलं नाही तर मृत्यू होऊ शकतो.
तरुण फिटनेस प्रेमींमध्ये काही धोकेदायक घटक लक्षातच घेतले जात नाहीत. त्यात भर म्हणजे शरीरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम कमी असणं, हाय-कॅफिन फॅट बर्नर घेणं आणि कधीच बेसिक तपासण्या न करणं. ईसीजी नाही, इको नाही, इलेक्ट्रोलाइट लेव्हल्स तपासल्या नाहीत,” असं तो म्हणाला.
डॉ. अग्रवाल यांनी स्पष्ट सांगितलं, “ही गोष्ट फक्त रोहनपुरती मर्यादित नाही. तुमचा जिम पार्टनर, तुमचा भाऊ, तुमचा जोडीदार… अगदी तुम्ही स्वतःही असू शकता. बाहेरून पूर्णपणे निरोगी दिसत असलात तरी, बेसिक हेल्थ स्क्रीनिंग टाळू नका, असा त्यांनी सल्ला दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.