
हातांवरील फुगलेल्या नसा गंभीर आजाराचे संकेत असू शकतात.
नसांचे व्हॉल्व्ह कमकुवत झाल्यास नसा उभ्या दिसतात.
रक्ताभिसरण वाढल्याने नसा फुगू शकतात
अनेक वेळा हातांवर उभ्या दिसणाऱ्या किंवा फुगलेल्या नसांकडे लोक दुर्लक्ष करतात. बहुतेक जण या परिस्थितीला साधी गोष्ट समजून गंभीरपणे घेत नाहीत. मात्र कालांतराने ही समस्या वाढू शकते. तुम्हाला माहिती आहे का, हाताच्या नसा फुगण्यामागे १-२ नव्हे तर तब्बल ५ मोठ्या आजारांचे संकेत लपलेले असतात?
आजच्या या आर्टिकलमधून आपण जाणून घेऊया की हाताच्या या समस्येची कारणं कोणती आहेत.
नसांच्या आत रक्ताची वाहतूक नियंत्रित करणारे व्हॉल्व्ह जर कमकुवत झाले, तर त्या नसां बाहेर उभ्या दिसू लागतात. अशावेळी नसा कमजोर पडतात आणि रक्तही त्यात साचू शकतं. त्यामुळे हातांवर नसांचा उभार स्पष्ट दिसतो.
शरीरात रक्ताभिसरण जास्त झाल्यास हातांच्या नसां फुगू लागतात. या स्थितीत बहुतेक लोकांचा रक्तदाबही वाढतो. अशावेळी हातावरच्या फुगलेल्या नसांकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
फ्लेबिटिस म्हणजे नसांमध्ये सूज येण्याची परिस्थिती. यातही हातांवर उभ्या नसांचा उभार दिसू शकतो. ही गंभीर समस्या असल्याने याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यायला हवेत.
व्हेरिकोज व्हेन्स ही समस्या फक्त पायातच नव्हे तर हातांतही होऊ शकते. यात नसा जाडसर, वाकड्या-तिकड्या आणि उभ्या दिसतात. त्यामुळे हातांवर फुगलेल्या नसांची लक्षणं दिसल्यास घाबरायचं कारण नसून योग्य तपासणीसाठी डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे.
कधी कधी शरीराचं तापमान वाढल्यानेही हातांच्या नसां स्पष्ट दिसू लागतात. तापमान वाढल्यावर शरीर रक्ताला थंड करण्यासाठी ते त्वचेच्या वरच्या थरात पाठवतं. त्यामुळे नसां फुगल्यासारख्या दिसतात. अशा वेळीही वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
हाताला किंवा त्वचेखालील भागाला इजा झाल्यासही नसांचा उभार दिसू शकतो. अशा वेळी जास्त काळजी न करता योग्य वेळेत उपचार केल्यास समस्या बरी होते.
हातांवर नसा फुगण्याचे मुख्य कारण काय आहे?
नसांचे आतील व्हॉल्व्ह कमकुवत झाल्याने रक्त साचते आणि नसा उभ्या व फुगलेल्या दिसतात.
रक्ताभिसरण वाढल्याने हातावर काय परिणाम होतो?
रक्ताभिसरण वाढल्याने रक्त हातांच्या त्वचेजवळ येते, ज्यामुळे नसा स्पष्ट आणि फुगलेल्या दिसतात. त्यामुळे रक्तदाब वाढण्याचाही धोका असतो.
फ्लेबिटिस म्हणजे काय?
फ्लेबिटिस म्हणजे नसांमध्ये दाह किंवा सूज येणे. यामुळे नसा उभ्या, लाल आणि दुखणाऱ्या दिसतात आणि तात्काळ उपचार गरजेचे असतात.
व्हेरिकोज व्हेन्स हा आजार केव्हा होतो?
व्हेरिकोज व्हेन्समध्ये नसा जाड, वाकड्या-तिकड्या आणि उभ्या दिसतात. ही समस्या पायाबरोबर हातांवरही उद्भवू शकते.
शरीराचे तापमान वाढल्याने नसा का दिसू लागतात?
शरीराचे तापमान वाढल्यावर रक्त थंड करण्यासाठी त्वचेजवळ पाठवले जाते, ज्यामुळे नसा फुगल्यासारख्या दिसतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.