
HIV हा एक असा व्हायरस आहे जो शरीराला हळूहळू आतून कमकुवत करत जातो. अनेकांना वाटतं की हा आजार फक्त असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होतो, पण खरं तर यापेक्षा अधिक गंभीर आहे आणि समाजात याबाबत जागरूकतेची खूप गरज आहे. आजही आपल्या समाजात HIV/AIDS बाबत अनेक गैरसमज आहेत.
अनेक जण याला केवळ लैंगिक संबंधांशी जोडलेली गोष्ट समजतात, पण काही अगदी सामान्य वाटणाऱ्या सवयीही या विषाणूच्या प्रसाराचं कारण ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, HIV केवळ लैंगिक संबंधांमुळे पसरतो असं नाही. संक्रमित रक्त, एकाच सुईचा वापर किंवा वैयक्तिक वस्तूंचा इतरांनी वापर केल्यामुळेही हा आजार होऊ शकतो.
जर रक्त चढवण्याआधी HIV ची तपासणी केली गेली नाही तर विषाणू थेट शरीरात जाऊ शकतो. विशेषतः गावांमध्ये किंवा अप्रमाणित वैद्यकीय सुविधांमध्ये याचा धोका अधिक असतो.
ड्रग्ज घेणारे किंवा एखाद्या आजारामुळे सतत इंजेक्शन घेणारे जर एकाच सुईचा वापर करत असतील तर HIV झपाट्याने पसरू शकतो.
रेझर, ब्लेड, टूथब्रश अशा वस्तूंवर जर संक्रमित व्यक्तीच्या रक्ताचे अंश असतील आणि त्या जर दुसऱ्याने वापरल्या, तर ही समस्या होण्याचा धोका असतो.
जर एखादी महिला HIV पॉझिटिव्ह असेल आणि तिच्यावर उपचार सुरू नसतील तर गर्भात किंवा स्तनपानादरम्यान बाळालाही हा व्हायरस होऊ शकतो.
आपल्या वैयक्तिक वस्तू इतरांबरोबर कधीच शेअर करू नयेत.
नेहमी संरक्षित लैंगिक संबंध ठेवावेत.
डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्यावीत, अँटीरेट्रोव्हायरल थेरपी नियमितपणे घ्यावी.
HIV पॉझिटिव्ह व्यक्तींनी कधीच रक्तदान करू नये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.