Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 19'चे घर बनले युद्धाचे मैदान, ६ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Bigg Boss 19-Nomination : 'बिग बॉस 19'च्या घरी नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. या आठवड्यात ६ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'च्या घरात या आठवड्यात ६ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क दरम्यान सदस्यांमध्ये तुफान भांडणे होताना पाहायला मिळाली.

'बिग बॉस 19'च्या घरात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात या 'वीकेंड का वार'मध्ये दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. मालती चहर बिग बॉसच्या घरात आली आहे. नुकताच बिग बॉसने नॉमिनेशन टास्कचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात घरातील सदस्य एकमेकांशी भांडताना, एकमेकांना सुनावताना दिसत आहेत. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी 6 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

नॉमिनेशन टास्क

नॉमिनेशन टास्कमध्ये 'झपाटलेले खेळाचे मैदान' (Haunted Payground) दाखवण्यात आले आहे. या टास्कमध्ये दोन टीम पाडण्यात आल्या आहेत. ज्यात दोन्ही संघांना चेटकिणींपासून स्वतःचे रक्षण करायचे आहे आणि आपल्याला सुरक्षित ठेवायचे आहे. चेटकिणींने ज्या टीममधील सदस्यांची जास्त शिकार केली असेल ती टीम घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केली जाणार असते. घरातील नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री स्पर्धक मालती चहर या टास्कची मॉनिटर बनली.

नॉमिनेट सदस्यांची नावे

बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाल आहेत.

  • जीशान कादरी

  • नीलम गिरी

  • मृदुल तिवारी

  • बसीर अली

  • अशनूर कौर

  • प्रणित मोरे

नॉमिनेशन टास्कमध्ये अमाल मलिक आणि अशनूर कौर यांच्यात मोठे भांडण होते. तर नेहल जीशान कादरीला टार्गेट करते. तर मृदुल तिवारी तान्या मित्तलला टार्गेट करतो.मीडिया रिपोर्टनुसार, नीलम गिरी आणि जीशान कादरी हे या आठवड्यात घराबाहेर जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण यांचा गेम दिसत नसून यांना मतेही कमी आहेत. त्यामुळे येणारा 'वीकेंड का वार' अधिकच मनोरंजक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : - नंदुरबारच्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा मोठा दिलदारपणा

पुण्यातील गुन्हेगारीला बळ देणारा 'दादा' कोण? शरद पवारांच्या नेत्याकडून अजित पवारांवर हल्लाबोल

मोठा निर्णय! ऐनदिवाळीत सोलापुरातील २८९ धार्मिक स्थळावरील भोंगे उतरवले

Kids Health: मुलांना तंदुरुस्त करायचंय? मग 'हे' ६ सुपरफुड्स लहान मुलांच्या आहारात करा समाविष्ट

Gold Rate Prediction: सोनं ४०-५० हजारांनी होणार स्वस्त? पण कधी? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

SCROLL FOR NEXT