Bigg Boss 19  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : पहिल्याच आठवड्यात ७ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss 19 First Nomination : बिग बॉसच्या घरात पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. घरातील सात सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'मध्ये पहिल्या दिवसापासून सदस्यांनी भांडणांना सुरूवात केली आहे.

'बिग बॉस 19'चे पहिले नॉमिनेशन पार पडले आहे.

पहिला नॉमिनेशन प्रक्रियेत 7 सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे.

'बिग बॉस 19' चा (Bigg Boss 19) गेम दिवसेंदिवस अधिकच मनोरंजक होत जात आहे. कार्यक्रम सुरू होताच पहिले एलिमिनेशन पार पडले आहे. घरातील सदस्यांनी एकत्र मिळून फरहान भटला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आता बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन प्रक्रियेला सुरूवात झाली असून घरातील काही सदस्य नॉमिनेट देखील झाले आहे.

बिग बॉसने घरातील सदस्यांना नॉमिनेशन टास्क दिला होता. ज्यात सदस्यांना एकमेकांच्या चुका सांगून नॉमिनेट करायचे होते. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात घरातील सदस्य कॉन्फरन्स हॉलमध्ये एकत्र बसलेले पाहायला मिळत आहेत आणि एकमेकांची नावे सांगत आहेत. 'बिग बॉस 19'च्या पहिल्याच नॉमिनेशन प्रक्रियेत 7 सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. नॉमिनेट सदस्यांची यादी जाणून घेऊयात.

नॉमिनेट सदस्यांची नावे

  1. गौरव खन्ना

  2. झीशान कादरी

  3. अभिषेक बजाज

  4. नीलम गिरी

  5. प्रणित मोरे

  6. तान्या मित्तल

  7. नतालिया जानोस्जेक

वीकेंड का वार

नॉमिनेट झालेल्या 7 सदस्यांपैकी घराच्या बाहेर कोण जाणार हे, 'वीकेंड का वार'मध्ये समजणार आहे. तसेच पहिला 'वीकेंड का वार' पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सलमान खान कोणाचे कौतुक करणार? कोणाची शाळा घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' शो सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहत येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : हरतालिकेच्या पूजेच्या दिवशीच चिमुकलीचा मृत्यू; पूजेसाठी नदीवर गेली असता बुडाली

Elphinstone Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात एलिफस्टन पूल राहणार सुरु; या दिवशी पाडला जाणार

Shocking : मंत्र्यावर जीवघेणा हल्ला, गावकऱ्यांनी अनेक किमी केला पाठलाग, बॉडीगार्ड जखमी

Mobile Addiction : मोबाईलचा वापर दिवसभर करताय? या ३ गंभीर आजारांना जावं लागेल सामोरं

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचं वाजतगाजत आगमन, राज्यात उत्साहाचे वातावरण

SCROLL FOR NEXT