Bigg Boss 19 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19: 'माझ्याशी एकट्यात फ्लर्ट करते...'; अभिषेक बजाजने तान्या मित्तलची केली पोलखोल, लावले गंभीर आरोप

Bigg Boss 19: बिग बॉस १९ च्या नवीन प्रोमोमध्ये शहबाज आणि तान्या यांच्यात जोरदार भांडण झालं आहे. दरम्यान, या भांडणात अभिषेक असे काही बोलतो जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss 19: "बिग बॉस १९" या रिअॅलिटी शोमध्ये दररोज नविन ट्विस्ट आणि वळण पाहायला मिळत आहेत. हा असा शो आहे जिथे स्पर्धक कधी मित्र किंवा शत्रू बनतील हे सांगणे अशक्य आहे. अलिकडच्याच एका प्रोमोमध्ये शाहबाज बदेशा आणि तान्या मित्तल यांच्यात जोरदार भांडण दाखवण्यात आले. त्यांच्या भांडणादरम्यान, अभिषेक बजाजने असे काही सांगितले की तान्या संतप्त झाली.

शाहबाज आणि तान्याची भांडण

शाहबाजने "बिग बॉस १९" मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून प्रवेश केला. तेव्हापासून, त्याचे आणि तान्यामध्ये चांगले नाते आहे. त्यांनी कधी एकमेकांना मित्र म्हणून तर कधी भावंड म्हणून वागले आहे. पण, नवीन प्रोमोमध्ये दोघांमधील भांडणं उघड झाले आहे. व्हिडिओमध्ये शाहबाज म्हणतो, "लोकांनो, मी तुम्हाला सत्य सांगतो थांबा."

तान्या म्हणाली, "हो, मला सांगा." शाहबाज म्हणाला, "ही काहीतरी घडते की मग दोन मिनिटांत रडून लोकांना दाखवते... मी किती सुंदर, छान आणि सुसंस्कृत आहे ते पहा." त्यानंतर अशनूरने मोठ्याने घोषणा केली, ' इमोशनल कार्ड'

अभिषेकने केला मोठा दावा

अभिषेक शाहबाज आणि तान्या यांच्यातील भांडणात उडी घेत असे काही बोलला जो आता घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरु होतो. अभिषेक तान्याला म्हणाला, "अरे, मी एकटा असताना ती माझ्याशी फ्लर्ट करतेस." हे ऐकून शाहबाजने विचारले, "काय?" मग अभिषेक म्हणाला, "जेव्हा मी तिच्याकडे लक्ष देत नाही, तेव्हा ती विचारतेस की तू मला एकट्यात का भेटत नाहीस." हे ऐकून तान्या संतापली. मग तान्या म्हणाली, "अभिषेक, खोट्या गोष्टी पसरवू नकोस. मला तू माझ्याशी फ्लर्ट करण्याची गरज नाही. तुझा चेहरा बघ, तू माझ्या टाईपचा नाहीस.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे काय? बाळाला चक्क दोन लिंग, महिलेच्या प्रसृतीनंतर डॉक्टरही चक्रावले

Maharashtra Live News Update: परळीच्या निवडणुकीमध्ये न्यायालयाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा

Supreme Court: निवडणुका रद्द करू नाहीतर निकाल आम्ही देऊ: सर्वोच्च न्यायालय

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ; आयुष्य 'नकोसे' झाल्यानं महिलेने संपवली जीवनयात्रा

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

SCROLL FOR NEXT