Actor Controversy: बंगाली मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता रीजू बिस्वास (Riju Biswas) सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सोशल मीडियावर अनेक महिलांनी एकाच प्रकारचे, मॅसेजेस पाठवल्याचा आरोप केला आहे. या मॅसेजमध्ये अभिनेता महिलांना लिहायचा “तू साडीमध्ये खूप छान दिसतेस.” या वाक्यामुळेच सोशल मीडियावर त्याच्यावर तीव्र टीका होत आहे.
एका महिलेने रीजू बिस्वासकडून आलेला मॅसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर अनेक महिलांनी त्याच्यासारखेच मॅसेज मिळाल्याचं सांगितलं. काहींनी तर दावा केला की हे मॅसेज त्यांना मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास आले होते. हा विषय व्हायरल झाल्यानंतर रीजू बिस्वास यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागली.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रीजू बिस्वास यांनी सांगितले की, त्यांनी ते मॅसेज स्वतः पाठवले होते आणि त्यात काहीही चुकीचं नाही. त्यांच्या मते, “एखाद्या व्यक्तीचं कौतुक करणं गुन्हा नाही. साडी ही भारतीय परंपरेचा भाग आहे आणि मी केवळ प्रशंसा केली.” असं त्यांनी म्हटलं. त्यांनी आपले सोशल मीडिया खाते हॅक झाल्याचे वृत्त फेटाळत हे सर्व माझ्याविरोधात रचलेलं षड्यंत्र आहे” असा दावा केला.
परंतु या वादाने मोठं रूप घेतल्यामुळे रीजू बिस्वास यांनी स्वतःच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या वैयक्तिक मॅसेजेसचे स्क्रीनशॉट्स परवानगीशिवाय सार्वजनिकपणे शेअर केले गेले असून, त्यामुळे त्यांच्या गोपनीयतेचा भंग (Breach of Privacy) झाला आहे.
या प्रकरणावर अभिनेत्री अलोकानंदा गुहा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, रीजूने तिच्याशी एकदा व्यावसायिक कारणास्तव संपर्क साधला होता. परंतु संवादाचा स्वर नंतर वाईट झाला. दुसरीकडे, काही कलाकारांनी मात्र रीजूच्या बाजूने बोलत, “ते नेहमी सभ्य वागतात आणि हे सर्व गैरसमज आहेत,” असा दावा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.