Actress Death: हॉलिवूड अभिनेत्री आणि तीन वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या डायन लॅड यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. डिआने लॅड यांना काही वर्षांपूर्वी फुफ्फुसाच्या आजाराचे निदान झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. अखेर त्यांनी कॅलिफोर्नियामधील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. तिची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री, जुरासिक पार्क स्टार लॉरा डर्न (५८) यांनी सोमवारी एका निवेदनात ही दुःखद बातमी शेअर केली. तिने सांगितले की तिच्या आईचे कॅलिफोर्नियातील ओहाई येथील तिच्या घरी निधन झाले.
डिआने लॅड या २०व्या शतकातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३५ रोजी अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील लॉरेल शहरात झाला. बालपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या लॅड यांनी १९५० च्या दशकात रंगभूमीवरून आपला कलात्मक प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
१९७४ साली प्रदर्शित झालेल्या ‘Alice Doesn’t Live Here Anymore’ या चित्रपटामुळे त्यांना पहिल्यांदा ऑस्कर नामांकन मिळाले. त्यानंतर ‘Wild at Heart’ आणि ‘Rambling Rose’ या चित्रपटांसाठीही त्या ऑस्करसाठी नामांकित झाल्या. विशेष म्हणजे ‘Rambling Rose’ या चित्रपटात त्यांनी स्वतःच्या मुलीसोबत अभिनेत्री लॉरा डर्नसोबत काम केले होते, यामुळे ही आई-मुलगी जोडी त्या काळी चर्चेचा विषय ठरली.
डिआने लॅड यांनी अभिनयासोबत दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. त्यांच्या कारकिर्दीचा कालावधी तब्बल सहा दशकांहून अधिक होता. त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले, ज्यात गोल्डन ग्लोब, बाफ्टा नामांकन आणि विविध समीक्षक पुरस्कारांचा समावेश आहे.
त्यांचे वैयक्तिक जीवनही चित्रपटसृष्टीशी घट्ट जोडलेले होते. त्यांनी अभिनेता ब्रूस डर्न यांच्याशी विवाह केला होता. या दांपत्याला लॉरा डर्न ही मुलगी झाली, जी आज स्वतःही ऑस्कर विजेती अभिनेत्री आहे.त्यांच्या निधनानंतर लॉरा डर्नने सोशल मीडियावर लिहिले, “आई फक्त माझ्यासाठी नव्हे, तर जगभरातील अनेकांसाठी प्रेरणास्थान होती. तिचं प्रेम, तिचं साहस आणि तिची कला कायम आमच्यात जिवंत राहील.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.