Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 19'मध्ये मिड-वीक एविक्शनचा धक्का; निलम, अभिषेकनंतर बिग बॉसने 'या' सदस्याला दाखवला बाहेरचा रस्ता

Bigg boss 19-Mid Eviction : 'बिग बॉस 19'मधून मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या शोमध्ये मिड-वीक एविक्शन पार पडले. घरातून कोणता सदस्य बाहेर गेला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून निलम आणि अभिषेकची एक्झिट झाली.

बिग बॉसच्या घरात मिड-वीक एविक्शन पार पडले आहे.

बिग बॉसमध्ये प्रणित मोरेच्या एन्ट्रीने चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.

सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात 'वीकेंड का वार' डबल एलिमिनेशन पार पडले आहे. निलमसोबत अभिषेक बजाज देखील घराबाहेर पडला आहे. अभिषेक बजाजच्या एक्झिटनंतर चाहत्यांना आणि घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. अशात आता 'बिग बॉस 19' च्या घरात मिड-वीक एविक्शन पार पडले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मिड-वीक एविक्शनमध्ये घरातील सदस्य असेंब्ली रूमध्ये एकत्र आले. आपले मत देऊन त्यांनी घरातील एका सदस्याला बाहेर काढले. यात फरहाना भट्ट आणि मृदुल तिवारीचे नाव आघाडीवर पाहायला मिळाले. कमी मते मिळाल्यामुळे घरातील एका सदस्याचा प्रवास संपला आहे. घरातून कोण बाहेर गेला, जाणून घेऊयात.

'बिग बॉस 19' ची महिती देणाऱ्या सोशल मिडिया पेजप्रमाणे घरात मिड-वीक एविक्शन पार पडले आहे. यात मृदुल तिवारीचा पत्ता कट झाला आहे. मिड-वीक एविक्शनमध्ये मृदुल तिवारी 'बिग बॉस 19' च्या घरातून बाहेर झाला आहे. मृदुल तिवारीच्या गेम पाहून बिग बॉसचा होस्ट सलमान खानने त्याला अनेक वेळा सुधारण्याचा सल्ला दिला होता. मात्र वारंवार सल्ला देऊनही त्यांच्या खेळात कोणताही बदल दिसला नाही. तो स्वतंत्रपणे खेळत नाही. स्वतःची मते मांडत नाही. यावरून सलमानने मृदुल तिवारीला सुनावले होते.

आता बिग बॉसच्या घरात 9 सदस्य उरले आहेत. यात गौरव खन्ना, फरहाना भट्ट, कुनिका सदानंद, तान्या मित्तल, अमाल मलिक, शाहबाज बदेशा, अशनूर कौर, प्रणित मोरे, मालती चहर यांचा समावेश आहे. आता येणाऱ्या 'वीकेंड का वार' मध्ये बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foot Massage Tips: रात्री तळपायाला खोबरेल तेल लावा, पाय होतील मऊ अन् मुलायम

Cooking Tips No Onion: कोणत्या भाज्यांमध्ये कच्च्या कांद्याची फोडणी देऊ नये? भाजीची चव बिघडेल

दिल्लीनंतर पाकिस्तान हादरले, स्फोटानंतर कारने घेतला पेट; वकिलासह ५ जणांचा होरपळून मृत्यू

Crime News : मुंबई हादरली! गरोदरपणात पोटात लाथा मारल्या, गरम तेलाने भाजलं, सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Maharashtra Live News Update : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत जाहीर

SCROLL FOR NEXT