Bigg Boss 19  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : बिग बॉसने पहिल्याच दिवशी दाखवला घरचा रस्ता, 'या' सदस्याचा पत्ता कट

Farhana Bhatt Evicted : बिग बॉसच्या घरात पहिले एलिमिनेशन पार पडले आहे. १६ स्पर्धकांपैकी एका सदस्याने घराचा निरोप घेतला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19' कार्यक्रम 24 ऑगस्टपासून सुरू झाला आहे.

'बिग बॉस 19'चे होस्टिंग सलमान खान करत आहे.

'बिग बॉस 19' च्या घरात पहिले एलिमिनेशन पार पडले आहे.

'बिग बॉस 19' ची (Bigg Boss 19) धमाकेदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी घरात वाद पाहायला देखील मिळाला आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांना पहिल्याच दिवशी एक टास्क दिला गेला. ज्यात घरातील सर्व सदस्यांना एकत्र येऊन मतदान करून एका सदस्याला बाहेर काढायचे होते. याचा व्हिडीओ 'बिग बॉस 19' ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात घरातील सर्व सदस्य एका मिटींग रुममध्ये बसून एकमेकांशी भांडताना आणि एकमेकांच्या चुका दाखवताना दिसत आहे.

'बिग बॉस 19'ने शेअर केलेल्या व्हिडीओला त्यांनी खास कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं की, "बिग बॉस ने घरवालों के हाथ में दिया एक फैसला, किसका चलेगा खेल और कौन होगा घर से बेघर!" यंदा 'बिग बॉस 19' घरात सदस्यांचे सरकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे घरातील सदस्यच अनेक निर्णय घेत आहेत. असाच घरातील सदस्यांनी मिळून एक सदस्याला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तो सदस्य कोण? जाणून घेऊयात.

कोण गेले घराबाहेर?

'बिग बॉस 19' च्या घरात पहिले एलिमिनेशन पार पडले असून फरहान भटला (Farhana Bhatt ) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. घरातील सदस्यांनी एकत्र मिळून फरहान भटला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. आता मात्र बिग बॉसने गेममध्ये मोठा ट्विस्ट आणला आहे. त्यांनी फरहान भटला घराबाहेर न काढता एका सीक्रेट रूमध्ये आणले आहे. जेथे राहून फरहान भट सर्वांवर नजर ठेवू शकते. फरहान भटला घराबाहेर काढताना सदस्य म्हणाले की, ती घरात सर्वात कमी बोलते. तिची इतरांशी संवाद नाही.

'बिग बॉस 19' कुठे पाहता येणार?

सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' शो आता सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 19'ची यंदाची थीम राजकारणावर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : बसची जोरदार धडक, प्रवासी वृद्धाचा मृत्यू; यवतमाळच्या दारव्हा बसस्थानक आवारातील घटना

Pimple Warning : मुरुम काढण्याच्या निष्काळजीपणाने थेट मेंदूला धोका, या सामान्य समस्येला दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीचं आंदोलनही मुंबई धडकणार

पुणे - नाशिक प्रवास होणार जलद; २ तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर, कुठून कसा असणार एलिव्हेटेड मार्ग?

Vande Bharat: नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू, थांबा- तिकीट अन् वेळापत्रक काय? वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT