Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: वाइल्ड कार्ड सदस्यांच्या एन्ट्रीने सलमान खानच्या तोंडचे पाणी पळाले, नेमकं काय घडलं?

Salman Khan : दिवाळीच्या मुहूर्तावर बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड सदस्यांच्या एन्ट्री झाली आहे. कोण आहेत हे सदस्य जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात रोज एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आता 'बिग बॉस 18' मध्ये (Bigg Boss 18) दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घरात मोठा धमाका झाला आहे. बिग बॉसने या सीझनच्या पहिल्या दोन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री केली आहे. 'स्प्लिट्सविला १५' फेम दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर हे दोन वाइल्ड कार्ड सदस्य आहेत.

वाइल्ड कार्ड सदस्यांनी घरात धमाकेदार एन्ट्री केली आहे. जे पाहून सर्वच भारावून गेले आहे. मात्र त्याच्या येण्याने सलमान खान (Salman Khan) नाराज झाला आहे. कारण हे दोघ घरात येताच अस काही तरी वागतात ज्यामुळे भाईजान चक्क डोक्याला हात लावतात.

बिग बॉसने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री पाहायला मिळत आहे. दिग्विजय सिंह राठी (Digvijay Singh Rathee) आणि कशिश कपूर (Kashish Kapoor) स्टेजवर एकत्र आल्यावर दोघही भांडू लागतात. ज्यामुळे सलमान खान खूप नाराज होतो. सलमानने दोघांना विचारले की, तुम्ही एकमेकांना ओळखता का? यावर कशिश बोलते की "मी मेन कॅरेक्टर आहे." असे बोलून कशिश आणि दिग्विजयच्या वादाला सुरूवात होते.

कशिश दिग्विजयला बोलते की, तुझ्या नशीबाची दोरं माझ्याचं हातात होती. यावर दिग्विजय बोलतो की, तुझ्यामुळे माझं लहानपणीचे स्वप्न मोडलं. त्यांचा हा आरोप-प्रत्यारोपांचा कार्यक्रम सुरूच राहीला. सलमान खानच्या तोंडचे पाणी पळाले आणि त्याने वैतागून डोक्याला हात लावला.

दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर हे दोघही 'स्प्लिट्सविला १५'मध्ये एकत्र पाहायला मिळाले. स्प्लिट्सविलामध्ये हे दोघ कपल होते. हे कपल फिनालेपर्यंत गेले होते. आता हे नवीन वाइल्ड कार्ड सदस्य घरात काय राडा घालणार आहे, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरचा महापौर मुंबईत ठरणार; सुजय विखे पाटील यांची माहिती

Lipstick Types: डेली वेअर किंवा पार्टीसाठी कोणती लिपस्टिक आहे परफेक्ट?

MLA Harish Daroda: अजित पवारांच्या आमदाराच्या पुतण्याचा तुरुंगात मृत्यू, घोटाळा प्रकरणात होता अटकेत

India Post Recruitment 2026: परीक्षा नाही थेट केंद्र शासनाची नोकरी, अट फक्त १०वी पास...

Google search: गुगलवर सर्वात प्रथम कोणता शब्द सर्च केला गेला?

SCROLL FOR NEXT