Sangram Chougule
Bigg Boss MarathSAAM TV

Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर रितेशनं घेतला संग्राम चौगुलेचा क्लास; म्हणाला, वाइल्ड कार्ड नव्हे...

Sangram Chougule : या आठवड्यात बिग बॉस घरात भाऊच्या धक्क्यावर अनेकांची कानउघडणी होणार आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्री संग्राम चौगुलेला रितेश भाऊ खडेबोल सुनावणार आहे.
Published on

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) च्या घरात या सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री या आठवड्यात करण्यात आली. याचे नाव बॉडी बिल्डर संग्राम चौगुले आहे. घरात एन्ट्री करताच दादागिरी करणारा संग्राम नंतर मात्र घरात दिसेनासा झाला. संग्रामचा (Sangram Chougule) गेम प्लान या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. वाइल्ड कार्ड सदस्य असून तो खेळत नाही यावर रितेश भाऊंनी (Riteish Deshmukh) त्याचा क्लास घेतला. कारण वाइल्ड कार्ड एन्ट्री करणारा सदस्य येताना घरातील परिस्थिती तसेच लोकांचे स्वभाव पाहून येतो आणि आपला गेम दाखवतो. मात्र संग्रामच्या बाबतीत असे काही दिसत नाही आहे.

'बिग बॉस मराठी' नव्या प्रोमोमध्ये संग्राम चौगुलेचा खेळातील सहभागाबद्दल रितेश भाऊ बोलताना दिसत आहे. रितेश भाऊ म्हणतोय की,"संग्राम तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात पण 'बिग बॉस'च्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया झाला आहात. तुमचे अस्तित्व दिसतचं नाही. महाराष्ट्राची अपेक्षा होती की या घरात एक वाइल्ड कार्ड यावा आणि त्याने एक अख्खा गेम पलटवून टाकावा. 'बिग बॉस मराठी' च्या या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर माइल्ड कार्ड म्हणून आला आहात".

आता रितेश भाऊच्या क्लासनंतर संग्राम चौगुले कसा खेळ खेळणार? संग्रामच्या नव्या गेम प्लॅनचा निक्की आणि अरबाजवर काय परिणाम होईल? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच आर्या आणि निक्कीच काय होणार? बिग बॉस आर्याला कोणती शिक्षा देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. 'बिग बॉस मराठी'चा हा गेम दिवसेंदिवस मनोरंजक होत आहे.

Sangram Chougule
Hina Khan Post: महिमा चौधरीनं हिना खानला दिला धीर, कॅन्सरमधून बाहेर येण्यासाठी दिला मानसिक आधार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com