Bigg Boss 18: canva
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: हिट शोमधून रातोरात बाहेर झाला, आता थेट बिग बॉसची ऑफर? अभिनेत्याचं खुललं नशीब

Bigg Boss 18 Contestents: "रिश्ता क्या कहलाता है" फेम अभिनेत्याला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. या अभिनेत्याला आता थेट सलमानच्या बिग बॉसची ऑफर आली आहे.

Saam Tv

बिग बॉसचा १८वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये नव्या सिझन बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर देखील बिग बॉसबद्दल अनेक अपडेट पाहायला मिळत आहेत. बिग बॉसचा १८वा सिझन ५ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉस १८च्या सदस्यांची यादी समोर आली होती. परंतु बिग बॉसच्या टीमकढून अद्यापही कोणत्या प्रकाराची अधिकृत माहिती मिळाली नाही.

बिग बॉसच्या घरामध्ये अनेक राडे पाहायला मिळतात. अनेक कलाकांरांना बिग बॉसच्या माध्यमातून स्वता:चा फॅन बनवण्याची संधी मिळते. दरम्यान बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यासाठी दोन नावे समोर आली आहेत. त्यापैकी एका सदस्याला त्याच्या शोमधून बाहेर काढल्याची माहिती समोर येत आहे. तो सदस्य नेमकं कोण चला जाणून घेऊया.

रिपोर्टसनुसार, बिग बॉसमध्ये दोन नविन लोकप्रिय सदस्यांची दमदार एन्ट्री होणार आह. इतकच नाही तर या दोनही सदस्यांचे नाव बिग बॉसच्या यादीमध्ये कन्फॉर्म असल्याचं सांगितले जात आहे. "रिश्ता क्या कहलाता है" फेम शहजादा धामी आणि अभिनेत्री नायरा बॅनर्जी यांची बिग बॉस १८मध्ये दमदार एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु बिग बॉसच्या निर्मात्यांकडून याबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत यादी जाहीर केली नाही. "रिश्ता क्या कहलाता है" या मालिकेमध्ये शहजादा धामी अरमान पोद्दारची भूमिका साकारतो. या मालिकेमुळे शहजादा धामीला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. परंतु काही वादांमुळे शहजादा धामीला निर्माता राजन शाही यांनी शोमधून बाहेर काढल्याची माहिती समोर आली होती.

शहजादा धामीला शोमधून बाहेर काढल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. शहजादा धामी आणि नायरा बॉनर्जी यांच्या सोबत पांडे, ऐनाश मिश्रा, ईशा कोपीकर, धीरज कपूर, निया शर्मा, कनिका मान, शोएब इब्राहिम, श्रीराम चंद्रा, दिग्विजय राठी, कशिश कपूर, झान खान, सोनल वेंगुर्लेकर, मॅक्सविकार्ट, दिग्विजय राठी या कलाकारांचं यादीमध्ये नाव आहे. धनजानी आणि समीरा यांचाही बिग बॉसच्या घरात समावेहोऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT