Bigg Boss 18 final : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 18'चा धमाकेदार ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. होस्ट सलमान खानने बिग बॉस 18 च्या विनरची घोषणा केली. बिग बॉस 18 ला विनर मिळाला असून या शोची ट्रॉफी करणवीर मेहराने आपल्या नावावर केली आहे. तर, विवियन डिसेना या शोचा उपविजेता ठरला आहे. बिग बॉस 17 ला करणवीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, रजत दलाल आणि चुम दरंग हे पाच फायनलिस्ट मिळाले होते.
बिग बॉस 18 च्या प्रेक्षकांनी या सहा सदस्यांना खूप चांगली पसंती दिली. पण बिग बॉस विनरच्या शर्यतीमधून सुरूवातीला ईशा सिंग बाहेर पडली. ईशाच्या पाठोपाठ चुम दरंग, अविनाश मिश्रा आणि रजत दलाल देखील या शर्यतीतून बाहेर पडले. करणवीरआणि विवियन यांच्यामध्ये बिग बॉस 18 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी अटीतटीची लढत झाली. अखेर करणवीर मेहराने ही ट्रॉफी आपल्या नावावर केली.
बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले खूपच रंगतदार झाला. यावेळी बिग बॉसच्या घरातील सहाही फानलिस्टने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिले. बिग बॉस 18 च्या सहाही फानलिस्टच्या चाहत्यांना त्यांना आवडत असलेल्या स्पर्धकाने या शोची ट्रॉफी जिंकावी असे वाटत होते.
विनरची ट्रॉफी जिंकण्यासाठी करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना हे आमने-सामने आले. शेवटी या शोची टॉफी करणवीर मेहराने जिंकली. या शोच्या ट्रॉफी सोबत करणवीर मेहराला 50 लाख रुपयांचा चेक बक्षीस स्वरुपात मिळाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.