BB 18 Finale: चुमची एक्झिट; छोट्यागावापासून ते बिग बॉसच्या घरापर्यंत कसा होता प्रवास?

BB 18 Finale : बिग बॉस १८ च्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये असलेली अभिनेत्री चुम दरंग सर्वांची आवडती बनली आहे. या शोमध्ये टॉप ५ मध्ये जाऊन चुम स्पर्धेतून बाद झाली आहे.
chum darang
chum darangSaam Tv
Published On

Bigg Boss 18 final : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 18' व्या भागाचा ग्रँड फिनाले सुरु असून या भागात ईशा सिंग सर्वात आधी बाहेर पडली. त्यानंतर राहिलेल्या ५ स्पर्धाकांपैकी आता अरुणाचल प्रदेशच्या चुम दरंगची एक्सिट झाली आहे. अरुणाचल प्रदेशापासून ते बिग बॉस १८ पर्यंतचा तिचा प्रवास फारच रोमांचक असा होता. जाणून घेऊयात कोण आहे नक्की चुम दरंग.

१६ ऑक्टोबर १९९१ रोजी अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथे जन्मलेल्या चुम दरंगने २००७ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलिंग मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २०१० मध्ये, चुमने मिस ऑल अरुणाचल प्रदेश स्टुडंट्स युनियन (AAPSU) हा किताब जिंकला. यानंतर तिने देशातील अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. चुम दरंग ही मिस नॉर्थ ईस्ट दिवा २०१४ ची फायनलिस्ट देखील राहिली आहे. २०१५ मध्ये, चुम दरंग मिस हिमालयाची दुसरी उपविजेती ठरली.

chum darang
Bigg Boss 18: २ कोटी दंड आणि...; बिग बॉसचे घर मध्येच सोडल्यास मिळणारी 'ही' मोठी शिक्षा!

यानंतर, २०१६ मध्ये, तिने मिस अर्थ इंडिया २०१६ मध्ये भाग घेतला आणि मिस अर्थ इंडिया वॉटरचा किताब जिंकला. २०१७ मध्ये, चुमने मिस एशिया वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, या स्पर्धेत २४ देशांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत चुमने पाचवे स्थान पटकावले आणि मिस इंटरनेट उपशीर्षक जिंकले. २०१७ मध्ये, चुम दरंगने मिस टियारा इंडिया इंटरनॅशनल जिंकली आणि 'मिस स्पोर्ट्स गियर' आणि 'मिस बेस्ट नॅशनल कॉस्ट्यूम' असे आणखी दोन किताब जिंकले.

chum darang
Bigg Boss 18: २ कोटी दंड आणि...; बिग बॉसचे घर मध्येच सोडल्यास मिळणारी 'ही' मोठी शिक्षा!

चुम दरंगची अभिनय कारकीर्द

चुम दरंगची अभिनय कारकीर्द ओटीटीपासून सुरू झाली. चुमने अमेझॉन प्राइम व्हिडीओवरील 'पाताल लोक' (२०२०) या वेब सिरीजमधून पदार्पण केले. त्याच वेळी, चुम दरंगचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट बधाई हो (२०२२) होता, यामध्ये चुमने भूमी पेडणेकर आणि राजकुमार राव सारख्या कलाकारांसोबत काम केले होते. याशिवाय, चुमचा दुसरा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' होता, जो २०२२ मध्ये आला होता, यामध्ये ती आलिया भट्टसोबत दिसली होती.

असे म्हटले जाते की अभिनयाव्यतिरिक्त, चुम दरंग स्वतःचा व्यवसाय देखील चालवते. ती अरुणाचल प्रदेशातील पासीघाट या त्याच्या मूळ गावी स्वतःचा 'कॅफे चू' चालवतो. चुम दरंग सामाजिक कार्यत देखील सक्रिय आहे. चुम दरंगने 'बिग बॉस १८' च्या घरातच याबद्दल सांगितले होते. चुमला निरोप देताना तिच्या परिवारातील सदस्य यावेळी उपस्थित होते. टॉप ५ मध्ये गेलेल्या चुमचे सोशल मीडियावर खास कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com