Bigg Boss 18: शॉकिंग एविक्शन; 'टॉप 3' मधून रजतची एक्झिट, चाहते नाराज

Bigg Boss 18 final : बिग बॉस १८ चा फिनाले सुरु असून हळूहळू एक एक स्पर्धकाची एक्सिट होत आहे. ३ स्पर्धक आऊट झाले असून आता चौथ्या स्पर्धकाची देखील एक्सिट झाली आहे.
Rajat dalal bigg Boss 18 Top 3
Rajat dalal bigg Boss 18 Top 3Google
Published On

Bigg Boss 18 final : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 18' व्या भागाचा ग्रँड फिनाले सुरु असून या भागात ईशा सिंग सर्वात आधी बाहेर पडली. त्यानंतर राहिलेल्या ५ स्पर्धाकांपैकी चुम दरंगला निरोप दिला तर आता ..... या तिसऱ्या स्पर्धकाची एक्सिट झाली आहे.

रजत दलाल बिग बॉसमधून बाहेर पडला आहे

बिग बॉस १८ च्या घरात रजत दलालने अनेक समीकरणे बनवली. तो आत्मविश्वासाने खेळला आणि प्रेक्षकांना त्याचा यंग एन्ट्री मॅन लूक खूप आवडला. रजतने आपल्या स्पष्टवक्ता शैलीने सर्वांचे मन जिंकले. अनेकांनी त्याला बिग बॉसचा विजेताही म्हटले. पण रजत दलाल बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकला नाही. रजत दलाच्या बिग बॉस १८ च्या घरातून पडला असून आता विजेता विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात स्पर्धा सुरु आहे.

Rajat dalal bigg Boss 18 Top 3
BB 18 Finale: चुमची एक्झिट; छोट्यागावापासून ते बिग बॉसच्या घरापर्यंत कसा होता प्रवास?

रजत दलालच्या एक्सिटवर नेटकऱ्यांनी काय म्हटले?

रजत दलालच्या बाहेर पडण्यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, "मला अजूनही विश्वास बसत नाहीये... हे कसे घडले" दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, "रजत खूप चांगला खेळला आहे... तो प्रेक्षकांसाठी एक विजेता आहे." रजतला YouTuber आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवकडून खूप पाठिंबा मिळाला.

Rajat dalal bigg Boss 18 Top 3
Bigg Boss 18: २ कोटी दंड आणि...; बिग बॉसचे घर मध्येच सोडल्यास मिळणारी 'ही' मोठी शिक्षा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com