Bigg Boss 18  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Bigg Boss 18 Contestants Final List: बिग बॉस हिंदीच्या १८व्या सिझनला धमाकेदार सुरुवात झाली आहे. ग्रँड प्रिमियरमुळे चाहत्यांमध्ये शोबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Saam Tv

कलर्स वरिल सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉस १८ला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या ग्रँड प्रिमियरच्या सुरुवातीला बॉलिवूॉचा भईजान सलमान खान याची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळाली होती. त्यानंतर घरामध्ये सर्व सदस्यांनी पदार्पण केले आहे. प्रेक्षकांमध्ये बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाबाबत भरपूर उत्सुकता पाहायला मिळाली होती.

काही दिवसांपूर्वी कलर्सकडून बिग बॉस १८ चा प्रोमो त्यांच्या आधिकृत सोशल मीडिया आकाऊंटवर प्रदर्शित करण्यात आला होता. प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बिग बॉस १८बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

बिग बॉस १८मध्ये हिंदी मालिकेतून प्रसिद्ध झालेली चाहत पांडेने बिग बॉसच्या घरामध्ये पहिलं पाऊल टाकले आहे. त्यानंतर अभिनेता शहझादा धामी आणि अविनाश मिश्रा यांचा जबरदस्त जान्स परफॉमेंसनी चाहत्यांचे मनोरंजन केले आणि बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री केली. आनंदाची गोष्ट म्हणजे मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांची बिग बॉस १८च्या घरामध्ये दमदार एन्ट्री झाली. त्यानंतर राजकारणतील विवादग्रस्त वक्तव्य करणारे राजकारणी तजिंदर बग्गाची बिग बॉसच्या १८मध्ये एन्ट्री केली आहे.

बिग बॉस १८च्या घरामध्ये तामिळनाडूची कॉमेडी क्विन  श्रुतिका, नायरा, चुम डरांग, करण वीर मेहरा, रजत दलाल, अरफीन खान आणि सारा अरफीन खान, ईशा, गुणरत्न सदावर्ते आणि हेमा या सदस्यांचे बिग बॉसच्या १८व्या सिझनमध्ये आगमन झाले आहे. आता घरातील सर्व सदस्य नेमकं काय कल्ला करणार याकडे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT