Housefull 5 Movie: प्रेक्षकांचं मनोरंजन होणार 'फूल'; हाऊसफूल ५ चित्रपटात आणखी एका स्टारची एन्ट्री

Akshay Kumar's Housefull 5 Movie: बॉलिवूड सुपर स्टार अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ५' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हाऊसफुल ५' या चित्रपटामध्ये बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांची एन्ट्री होणार आहे.
Akshay Kumar's Housefull 5 Movie
Housefull 5 Moviecanva
Published On

बॉलिवूड निर्माता साजिद नाडियाडवाल याच्या यशस्वी चित्रपटांमध्ये 'हाऊसफुल' चित्रपटाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. 'हाऊसफुल' चित्रपटाचे एकूण चार भाग प्रदर्शित झाले आहेत. चारही चित्रपटांमध्ये बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली आहे. आश्चर्यांची बाब म्हणजे 'हाऊसफुल' चित्रपटाचे चारही भाग सुपरहिट ठरलेत. गेल्यावर्षी चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'हाऊसफुल ५' चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये देखील अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाला चार चाँद लावण्यासाठी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते सुद्धा दिसणार आहेत.

'हाऊसफुल ५'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. माहितीनुसार, 'हाऊसफुल ५' चित्रपटामध्ये अभिनेता फरदीन खान आणि संजय दत्त अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये फूल ऑन कॉमेडीचा टच पाहायला मिळणार आहे. काही दिवसापासून आणखी एका दिग्गज कलाकाराचं नाव या चित्रपटाशी जोडलं जात आहे. बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ या चित्रपटामध्ये झळकणार असल्याची माहिती मिळत आहे.

Akshay Kumar's Housefull 5 Movie
Akshay kumar new film:अक्षय कुमार पुन्हा घेऊन येतोय हॉरर कॉमेडी, Bhoot Bangla मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

रिपोर्ट्सनुसार, जॅकी श्रॉफ 'हाऊसफुल ५' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. जॅकी श्रॉफ यांनी १९८३ मध्ये हिरो या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. जॅकी त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी खूप प्रसिद्ध आहेत. अशातच 'हाऊसफुल ५' मध्ये सर्व कलाकार चाहत्यांना हसवण्यात कुठेच कमी पडणार नाहीत अशी आशा अनेकांनी वर्तवलीय. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, फरदीन खान, रितेश देशमुख, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिस आणि चंकी पांडे यांच्या सारखे कलाकार दिसणार आहेत.

चित्रपटामधील कलाकारांच्या यादीमध्ये जॅकी श्रॉफ यांचा देखील समावेश झाला आहे. 'हाऊसफुल ५' चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित होणार होता परंतु काही कारणांमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 'हाऊसफुल ५' चित्रपट ६ जून २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे.

Edited By: Nirmiti Rasal

Akshay Kumar's Housefull 5 Movie
Akshay Kumar: स्त्री २ नंतर अक्षय कुमार दिसणार आणखी एका हॉरर चित्रपटात; फस्ट लूकने वाढवली उत्सुकता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com