Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 18' ची सदस्य 'पैठणी' चित्रपटात झळकणार, मृणाल कुलकर्णीसोबत शेअर करणार स्क्रीन

Eisha Singh : 'बिग बॉस 18'ची सदस्य 'पैठणी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) सध्या दिवसेंदिवस रंजक होत जात आहे. प्रत्येक जण आपला गेम प्लान दाखवत आहे. बिग बॉसच्या घरात सध्या प्रेमाचे वारे देखील वाहू लागले आहेत. अविनाश मिश्रा आणि ईशा सिंग यांची मैत्री छान खुलतं जात आहे.

आता बिग बॉसची ईशा (Eisha Singh) चित्रपटात झळकणार आहे. 'पैठणी' या चित्रपटातून ईशा सिंग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ईशासोबत मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) देखील मुख्य भूमिकेत आहे.

'पैठण' हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता येणार आहे. 'पैठण' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये ईशा आणि मृणाल कुलकर्णी पाहायला मिळत आहे. तसेच त्यांच्यासमोर पैठण विणताना दिसत आहे.'पैठणी' चित्रपटातून आई-मुलीची कथा दाखवण्यात येणार आहे. तसेच पैठणीचा वारसा पाहायला मिळणार आहे. या पोस्टरला त्यांना हटके कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी लिहिलं की, "आईचा वारसा आणि मुलीच्या ध्येयाची हृदयस्पर्शी कथा...जेथे परंपरेला प्रेम मिळते आणि वारशाचा आवाज मिळतो...#पैठणी" या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

ईशा सिंगने या आधी देखील अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ती टिव्हीची आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या ती बिग बॉसच्या घरात आपला गेम दाखवत आहे. 'एक था राजा एक थी रानी' ही तिची सर्वात गाजलेले मालिका आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये कारमध्ये सापडले ३५ लाख; पोलिसांकडून रक्कम जप्त

Rahul Gandhi News : राहुल गांधींची संविधानासह महाराष्ट्रात एन्ट्री; आरक्षणाबाबत दिली मोठी गॅरंटी

Sai Tamhankar: फ्लोरल रेड लेहेंगा आणि सईचा अनोखा अंदाज

IND vs SA 1st T20I: भारत- दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

Jogeshwari Vidhan Sabha : गुरु कधी कमजोर नसतो, सव्वाशेर असतो; रवींद्र वायकरांची बाळा नर यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT