Munawar Faruqui  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Munawar Faruqui: 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?

Munawar Faruqui Hospitalized: मुनव्वरचा हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुनव्वरची अवस्था पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. तो लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

Priya More

'बिग बॉस १७' चा (Big Boss 17) विनर मुनव्वर फारुकीची (Munawar Faruqui) तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुनव्वरच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. मुनव्वरचा हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुनव्वरची अवस्था पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. तो लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

मुनव्वर फारुकीचा मित्र नितीन मेंघानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुनव्वर हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. मुनव्वरच्या हाताला आयव्ही ड्रिप लावलेले दिसत आहे. नितीनने या फोटोवर लिहिले की, माझा भाऊ मुनव्वर फारुकी लवकर बरा व्हावा. पण, मुनव्वरला नेमकं काय झालं. त्याला रुग्णालयात का दाखल करण्यात आले या मागचे कारण मात्र समजू शकले नाही.

मुनव्वरचा हॉस्पिटलमधील फोटो पाहून त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. मुनव्वरच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी ते प्रार्थना करत आहेत. प्रकृती खराब झाल्यामुळे मुनव्वर रुग्णालयामध्ये दाखल होण्याची ही पहिली वेळ नाही. मागच्या महिन्यात देखील त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुनव्वर वारंवार आजारी पडत असल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुनव्वर एक हुशार स्टँडअप कॉमेडियन आहे. 'बिग बॉस 17' च्या ग्रँड फिनालेमध्ये सर्वाधिक मते मिळवून मुनव्वर फारुकी विनर ठरला होता. त्याला बिग बॉस जिंकल्यानंतर ट्रॉफी आणि आलिशान कार गिफ्ट म्हणून देण्यात आली होती. मुनव्वरसोबत या शोमध्ये अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि अरुण हे अन्य चार स्पर्धक अंतिम फेरीत होते. दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि गायकाने अलीकडेच त्याचे नवीन गाणे 'DHANDHO' रिलीज केले. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर हे त्याचे पहिले गाणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT