Bigg Boss 17 Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: ...तर मी तुला सोलून काढलं असतं, अभिषेक कुमारवर का संतापला सलमान खान?

Salman Khan Angry On Abhishek Kumar: या आठवड्याच्या विकेंड का वारमध्ये सलमान खान अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मन्नारा चोप्रावर (Mannara Chopra) संतप्त झाला आणि त्याने त्यांची चांगलीच शाळा घेतली.

Priya More

Bigg Boss 17 Promo:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या या शोची चांगलीच चर्चा रंगली आहे. या शोच्या वीकेंड का वारमध्ये सलमान खान (Salman Khan) नेहमी घरातील काही स्पर्धकांची शाळा घेत असतो.

आठवडाभरामध्ये घरामध्ये राडा करणाऱ्या, भांडण करणाऱ्या आणि कटकारस्थान रचणाऱ्या सदस्यांना सलमान खान खडेबोल सुनावतो. आता या आठवड्याच्या विकेंड का वारमध्ये सलमान खान अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि मन्नारा चोप्रावर (Mannara Chopra) संतप्त झाला आणि त्याने त्यांची चांगलीच शाळा घेतली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकताच 'बिग बॉस १७' चा नवा प्रोमो समोर आला. या 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान अभिषेक आणि मन्नाराला संतप्त होऊन खडेबोल सुनावताना दिसत आहे. सलमान अभिषेकला म्हणतो की, मी तुला चांगलेच सोलून काढलं असतं. सलमान खान अभिषेकवर चिडला कारण त्याने मागच्या एपिसोडमध्ये ईशा मालवीयसोबत झालेल्या भांडणात अनेक वाईट गोष्टी बोलला होता. त्याने ईशाच्या चारित्र्यावर बोट दाखवले आणि तिच्यावर वन नाईट स्टँडचा आरोप केला. ईशाबद्दल केलेल्या अपशब्दांमुळे यावेळी अभिषेक सलमान खानच्या तावडीमध्ये सापडला.

सलमान खानने अभिषेक कुमारला बिग बॉसचा सर्वात बनावट स्पर्धक म्हटले आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, सलमान खान अभिषेकला म्हणतो की, 'जर आपण बिग बॉसच्या घरातील सर्वात बनावट स्पर्धकाला पुरस्कार देऊ शकलो असतो. तर या घरात एकच स्पर्धक असेल तो म्हणजे अभिषेक कुमार. ईशाला हे म्हणणं की तू रात्री कुठेतरी जाऊन..., जर हे तू माझ्यासमोर बोलला असतास तर मी तुला चांगलंच सोलून काढलं असतं. ईशा या पुढे अभिषेक ओरडला, रडला, वस्तू तोडल्या, त्याचे डोके आपटले तरी तू तिथे जाऊ नकोस.'

वीकेंड का वारमध्ये फक्त अभिषेक कुमारच नाही तर मनारा चोप्रा देखील सलमान खानच्या रडारवर येणार आहे. शुक्रवार का वारमध्ये सलमान खान म्हणाला, 'मनारा मी तुझ्यावर खूप नाराज आहे. स्पॉइल्ड चाइल्डचे वय निघून गेले आहे.' सलमान मनाराबद्दल मुनव्वरला म्हणाला, 'मुनव्वर, तू जग पाहिलं आहेस, असं काय होतं. ही तुझी जबाबदारी नाही. तिच्या मनात काहीच येणार नाही. ती स्वतः हा गेम खेळतेय.' दरम्यान, बिग बॉस 17 अधिक मनोरंजक बनवण्यासाठी एक के-पॉप स्टार बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री करणार आहे. पार्क मिन-जुन उर्फ ​​अओरा असं या स्पर्धकाचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Rashmika Mandanna Engagement : नॅशनल क्रश रश्मिकानं गुपचूप उरकला साखरपुडा? अंगठीने वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा

iPhone 17: आयफोन १७ केवळ २ दिवसांत लाँच होणार, किंमत आणि फीचर्स चर्चेत

Chandra Grahan 2025: आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; तब्बल ८२ मिनिटं दिसणार Blood Moon, जाणून घ्या सुतक काळ

SCROLL FOR NEXT