Bigg Boss 17 Weekend Ka War Latest Updates Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Weekend Ka War: ...अन् सलमान खानचा पारा चढला, राडा करणाऱ्या स्पर्धकांची घेतली शाळा; यावेळी कोण घराबाहेर जाणार?

Bigg Boss 17 Latest Promo: नुकत्याच झालेल्या विकेंडला सलमान खानने घरातील काही सदस्यांची चांगलीच कानउघडणी करताना दिसला. यंदाच्या विकेंडला कोणते स्पर्धक बाहेर जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Weekend Ka War Latest Updates

‘बिग बॉस १७’ ची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला हा शोमध्ये नुकताच ‘विकेंड का वार’ पार पडला. काल अर्थात ११ नोव्हेंबरला बिग बॉसच्या घरात चौथा विकेंड का वार पार पडला. सध्या सोशल मीडियावर काही प्रोमो व्हायरल होत आहेत. या प्रोमोमध्ये, सलमान खान घरातील काही सदस्यांची चांगलीच कानउघडणी करताना दिसत आहे. ‘बिग बॉस १७’चा हा प्रोमो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स X (ट्वीटर)वर चांगलाच व्हायरल होतोय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘बिग बॉस १७’चा हा धमाकेदार प्रोमो, ‘बिग बॉस तक’ च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स X अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये, सलमान खान स्पर्धक ऐश्वर्या शर्मावर प्रचंड संतापल्याचे दिसत आहे. यावेळी सलमानने ऐश्वर्याच्या वागणुकीवरुन तिला चांगलंच झापलं. “तू नेहमीच नील भट्टसोबत उद्धट पद्धतीने वागते. ही तुझी वागणूक खूपच चुकीची आहे. तू अनेकदा त्याला डायरेक्ट ‘ये चल निघ, तू चल निघ…’ असं म्हणते. असं बोलणं चुकीचं आहे. तू त्याच्यावर नेहमी ओरडते, ओरडल्यामुळे त्याचा संयमाचा बांध फुटेल आणि तुमच्या नात्यात कटुता येईल.” असं सलमान ऐश्वर्याला बोलताना दिसला.

पुढे सलमान ऐश्वर्याला बोलला, “तुमच्यापैकी कोणालाही एका छोट्या गोष्टीचा राग येईल आणि तुमच्यातले नाते तुटेल. अशी गोष्ट माझ्यासोबतही घडली आहे. सलमानने समजावल्यानंतर ऐश्वर्याने माफी मागितली आहे, ती यावर काम करणार असल्याचे सांगितले.” ऐश्वर्या फक्त नीलसोबतच नाही तर इतर स्पर्धकांसोबतही चुकीच्या पद्धतीने वागते, त्यामुळे सलमानने तिची चांगलीच कानउघडणी केली आहे. यावेळी मन्नारा चोप्रालाही सलमानने तिच्या वागणुकीमुळे चांगलेच झापलेय.

मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या आठवड्यामध्ये दोन स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे बोलले जात आहे. तब्बल ९ स्पर्धकांना यंदाच्या आठवड्यामध्ये नॉमिनेट केले आहे. त्या ९ स्पर्धकांमध्ये, ऐश्वर्या शर्मा, समर्थ जुरेल, अरुण महाशेट्टी, अंकिता लोखंडे, नावेद सोल, मनारा चोप्रा, अनुराग डोवाल, नील भट्ट आणि सनी आर्य यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे आता कोण घरातून बाहेर जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

‘बिग बॉस १७’ जितका वादग्रस्त शो मानला जातो तितकाच लोकप्रिय शो म्हणून त्याची ओळख आहे. नुकताच शोमध्ये कतरिना कैफने ‘टायगर ३’च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी सलमान आणि कतरिनाने अफलातून डान्स करत स्पर्धकांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधले. यावेळी दोघांनीही हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पहावा अशी विनंती केली. यासोबतच बिग बॉसच्या घरात कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया या सुप्रसिद्ध कॉमेडियन कपलनेही हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT