Ankita Lokhande On Sushant Singh Rajput Saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: '...मी पूर्णपणे तुटले, एका रात्रीत आयुष्य बदललं', अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपुतसोबतच्या ब्रेकअपवर सोडलं मौन

Ankita Lokhande On Breakup With Sushant Singh Rajput: अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत तब्बल ७ वर्षे रिलेशनशीपमध्ये होते.

Priya More

Ankita Lokhande On Sushant Singh Rajput:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' ला (Bigg Boss 17) प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा शो दिवसेंदिवस चर्चेत येत आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. भांडण, वाद, राडा आणि प्रेम असं चित्र सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळत आहे.

या शोमध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत सहभागी झाली. हे कपल देखील प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. नुकताच अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) एक्स बॉयफ्रेंड म्हणजेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबतच्या (Sushant Singh Rajput) ब्रेकअपबद्दल मौन सोडले आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत तब्बल ७ वर्षे रिलेशनशीपमध्ये होते.

बऱ्याच वर्षांनंतर अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपुतबद्दल बोलली आहे. तिने मुनव्वर फारुखीला तिच्या मनातील ती गोष्ट सांगितली आहे. अंकिताने सांगितले की ते 'पवित्र रिश्ता' च्या सेटवर आम्ही प्रेमात पडलो. ७ वर्षे आम्ही एकमेकांना डेट केले. पण २०१६ मध्ये आमचा ब्रेकअप झाला. तो एकदम एका रात्रीत गायब झाला. त्याला यश मिळत होते त्यामुळे लोकं त्याचे कान भरत होते. आमच्यामध्ये प्रेम राहिले नव्हते. जेव्हा मी सुशांतच्या डोळ्यात पाहायचे तेव्हा मला त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम दिसत नव्हते. सुशांतकडून मला आमच्या ब्रेकअपचे कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नव्हते.'

अंकिताने पुढे सांगितले की, 'सुशांतपासून वेगळे झाल्यानंतर मी पूर्णपणे तुटली होती. एका रात्रीमध्ये आमचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. सुशांतने कोणतेही कारण नसताना माझ्याशी ब्रेकअप केला होता. त्याचे जाणे ही वेगळी गोष्ट होती पण मी खूप तुटले होते. माझ्या आई-वडीलही तुटले होते. मी कुठेही गुंतलेली नव्हती. पण मला वाटले की मला उभे राहावे लागेल त्या व्यक्तीसाठी ज्याच्यासोबत मी आधी होते. त्याचे वास्तव लोकांना कळले पाहिजे. कारण लोक जे बोलतात तसा तो नव्हता. मला त्याच्याबद्दल खूप काळजी वाटत होती.'

अंकिता म्हणाली की, 'सुशांतच्या मृत्यूच्या वेळी मला खूप ट्रोल करण्यात आले होते. अंकिता असती तर असे झाले नसते असे लोक म्हणाले. पण ही लोकं कुठं होती जेव्हा माझा ब्रेकअप होत होता. मग या लोकांनी सुशांतला का नाही म्हटलं की तू अंकितासोबत राहा. त्याने मला सांगून हे केलं असती तर मी स्वत:ला सांभाळलं असते. पण अचानक हे सगळं घडल्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला.'

दरम्यान, अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी 'पवित्र रिश्ता' या मालिकेमध्ये एकत्र काम केले होते. दोघे ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक २०१६ मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. जून २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर अंकिताला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अंकिताने विकी जैनला डेट करण्यास सुरूवात केली. त्यानंतर २०२१ मध्ये दोघांनी लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT