Salman Khan And Cristiano Ronaldo: खरंच ख्रिस्तियानो रोनाल्डोने सलमान खानला इग्नोर केलं?, तुम्हालाही असं वाटत असेल तर हा फोटो एकदा बघाच

Cristiano Ronaldo Ignored Salman Khan: बॉक्सिंग मॅच पाहण्यासाठी सलमान खान आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे शेजारी बसल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Salman Khan And Cristiano Ronaldo
Salman Khan And Cristiano RonaldoSaam Tv
Published On

Cristiano Ronaldo And Salman Khan Video:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) हे फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठे नाव आहे. तर ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) नाव जगातील उत्कृष्ट आणि आघाडीच्या फुटबॉलपटूंमध्ये घेतले जाते. हे दोधए दिग्गज आणि महान व्यक्तीमत्व नुकताच एकत्र दिसले.

बॉक्सिंग मॅच पाहण्यासाठी सलमान खान आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे शेजारी बसल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापैकी एक व्हिडीओ पाहून नेटिझन्स म्हणत होते की ख्रिस्तियानो रोनाल्डोने सलमान खानला इग्नोर केले. पण खरंच ख्रिस्तियानो रोनाल्डोने सलमान खानला इग्नोर केलं का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. यासंदर्भातला एक फोटो व्हायरल होत आहे जो पाहून तुमचा हा गैरसमज दूर होईल.

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि सलमान खान व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे चांगलेच चर्चेत आले होते. या दोघांचे आतापर्यंत जे व्हिडीओ व्हायरल होत होते त्यावर कमेंट्स करत नेटिझन्सने असे लिहिले होते की, 'रोनाल्डोने सलमानला त्याच प्रकारे इग्नोर केलं जसं सलमानने एका कार्यक्रमात विकी कौशलला इग्नोर केलं होतं.' पण या सर्व व्हिडीओनंतर आता एक असा फोटो समोर आला आहे ज्यावरून या सर्वांचा गैरसमज दूर होणार आहे. सलमान खान आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दोघेही एकमेकांशी हसत-हसत बोलताना दिसत आहेत.

सलमान खान सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये होता. याच ठिकाणी असलेली बॉक्सिंगची मॅच पाहण्यासाठी तो गेला होता. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोही आपल्या गर्लफ्रेंडसोबत ही मॅच पाहण्यासाठी आला होता. दोन्ही दिग्गजांना एकत्र पाहून चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या. या मॅचदरम्यान सलमान आणि ख्रिस्तियानो यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

सलमान आणि ख्रिस्तियानो यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी सलमान खानच्या फॅन्सची खिल्ली उडवायला सुरूवात केली होती. युजर्सनी त्या क्षणाची आठवण करून दिली जेव्हा सलमान खानने विकी कौशलला एका कार्यक्रमात इग्नोर केलं होतं. या व्हिडीओनंतर लगेचच सलमान आणि ख्रिस्तियानो यांचा फोटो व्हायरल झआला. ज्यामध्ये दोघेही एकमेकांशी बोलताना आणि हसताना दिसले. त्यामुळे खिल्ली उडवणाऱ्यांना या फोटोच्या माध्यमातून चोख उत्तर मिळाले.

सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खान आगामी 'टायगर 3' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कतरिना कैफ, टायगर श्रॉफ आणि इमरान हश्मी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमानकडे 'टायगर वर्सेस पठान' हा चित्रपट देखील आहे.

Salman Khan And Cristiano Ronaldo
Vipul Shah Security Upgraded: ‘केरळा स्टोरी’नंतर अदा शर्माचा नवीन चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात, धमकीच्या फोननंतर निर्मात्यांची सुरक्षा वाढली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com