Bigg Boss 17 Weekend Ka War Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Promo: 'तुझा काय अधिकार आहे....', बिग बॉसच्या घरामध्ये राडा करणाऱ्या अभिषेकची करण जोहरने घेतली शाळा

Bigg Boss 17 Latest Update: ‘विकेंड का वार’चं होस्टिंग आता करण जोहर करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘विकेंड का वार’मध्ये, करण जोहरचं आणि अभिषेक कुमारचं जोरदार भांडण झालं आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Weekend Ka War Latest Update

‘बिग बॉस १७’ (Bigg Boss 17)ची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. १७ व्या सीझनच्या पहिल्या दिवसापासूनच शोमधील स्पर्धकांमध्ये आपआपसात वाद होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये कधी काय होईल आणि काय नाही याचं कोणीही सांगू शकत नाही. या आठवड्यापासून बिग बॉसच्या घरामध्ये सलमान खान ‘विकेंड का वार’चं होस्टिंग करणार नाही. ‘विकेंड का वार’चं होस्टिंग आता करण जोहर करणार आहे. पहिल्याच दिवशी करण जोहरचं आणि अभिषेक कुमारचं जोरदार भांडण झालं आहे. (Bigg Boss)

'बिग बॉस 17' चा नवीन प्रोमो कलर्स टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये, अभिषेक कुमार कॅमेऱ्याच्या समोर येऊन जोरजोरात ओरडताना दिसत आहे. अभिषेकने रागाच्या भरामध्ये, माईक काढून फेकून देताना दिसत आहे. नेमका तो कोणत्या कारणामुळे इतका चिडला आहे, याचे उत्तर आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये मिळणार आहे. त्याचा राग शांत करण्यासाठी इतर स्पर्धक सुद्धा आलेले दिसत आहे. (Bollywood News)

प्रोमोमध्ये करण जोहर अभिषेकला म्हणतो की, या घरामध्ये तू प्रत्येक वेळी मर्यादा ओलांडली आहेस. तुला ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या त्या सामान्य प्रतिक्रिया नाहीत. यावर अभिषेकनेही करण जोहरला उत्तर दिले. तो म्हणतो, 'सर, तुम्ही प्रकरण कुठल्या कुठे का नेत आहेत?' हे ऐकून करणला स्वत:च्या रागावर कंट्रोल होत नाही. "मी कुठून कुठे विषय नेतोय? कधी बोलायचं आणि कधी गप्प बसायचं हे मला सांगण्याचा तुला काय अधिकार आहे?" (Entertainment News)

यंदाच्या विकेंडला करण जोहर फक्त अभिषेक कुमारवरच नाही तर अन्य स्पर्धकांचाही तो क्लासेस घेणार आहे. या यादीत मन्नारा चोप्रा आणि अंकिता लोखंडे यांच्यासह अनेक स्पर्धक असतील. यंदाच्या विकेंड का वार मध्ये करण जोहर आपल्या खास शैलीमध्ये, सर्वांनाच झापणार आहे. या विकेंडला बिग बॉसच्या घरामध्ये, 'तहलका' उर्फ युट्यूबर सनी आर्याचा (Sunny Arya) प्रवास संपला आहे. अभिषेकसोबत वाद घातल्यामुळे सनीला 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. (Social Media)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शनिशिगणापूरनंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा,शिर्डी संस्थांनच्या नावानं बोगस वेबसाईट

Reservation Row: बंजारा,धनगरां विरोधात आदिवासी आक्रमक,आदिवासींची थेट मुंबईत धडक

Kidney Stone: किडनीसाठी घातक ठरतील 'हे' पदार्थ, आजच खाणं टाळा

Devendra Fadnavis : मी १०० रुपये देतो, ठाकरेंच्या मागील १० भाषणात विकासावर एक वाक्य दाखवा; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Government Hostel Allowances: मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT