मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या धाटणीचे प्रयोग केले जात आहे. चित्रपटांप्रमाणेच मालिकांमध्येही त्याचा अवलंब केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मालिकांमध्ये नवनवे वळण आलेले पाहायला मिळत आहेत. अनेक मालिकांचा ट्रॅक सुद्धा बदललेला आहे.
आलेल्या नव्या वळणांचा आणि बदललेल्या कथानकाचा इम्पॅक्ट आपल्याला मालिकेच्या टीआरपीमध्ये दिसतो. नुकताच नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यातील टीआरपी चार्ट जाहीर झाला आहे. एक नजर टाकूया, यंदाच्या आठवड्यामध्ये कोणत्या मालिकेने टीआरपी चार्टमध्ये अव्वल क्रमांक पटकवला आहे. (Serial)
नेहमीच सोशल मीडियावर ‘मराठी टीआरपी तडका’ या इन्स्टाग्राम पेजवरुन प्रेक्षकांना टीआरपीचे अपडेट मिळत असतात. नुकतंच या अकाऊंटवरुन नोव्हेंबर महिन्यातील चौथ्या आठवड्यातला टीआरपी चार्ट समोर आला आहे. १८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यानचा टीआरपी चार्ट समोर आला आहे. (Marathi Film)
यंदाच्या आठवड्यातही टीआरपीच्या यादीमध्ये, ‘ठरलं तर मग’ ही मालिका अव्वल ठरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका टीआरपी यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरच आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. (Latest News)
अवघ्या काही दिवसातच मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका आली आहे. तर ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका थेट चौथ्या क्रमांकावरच पोहोचली आहे. मालिकेला गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (Entertainment News)
पाचव्या क्रमांकावर ‘आई कुठे काय करते’, सहाव्या क्रमांकावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ तर सातव्या क्रमांकावर ‘कुण्या राज्याची गं राणी’ ही मालिका आहे. जसजसे मालिकेमध्ये नवे ट्वीस्ट अनुभवायला मिळतात, त्या प्रमाणेच टीआरपी यादीमध्येही आपल्याला बदल होताना दिसत आहेत. (Social Media)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.