Ankita Lokhande And Vicky Jain Fight Again Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'मी तुमच्या कॅटेगिरीची नाही...', अंकिता- विकीमध्ये पुन्हा उडाले खटके, ढसाढसा रडली अभिनेत्री

Ankita Lokhande And Vicky Jain Fight Again: बिग बॉस 17 च्या घरातील सर्वांचे लाडके कपल अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्यामध्ये पुन्हा खटके उडाले आहेत. अंकिता आणि विकीमध्ये भांडण झाले आहे.

Priya More

Ankita Lokhande And Vicky Jain:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) सध्या चांगलाच चर्चेमध्ये आहे. हा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या शोचा तीन महिन्यांचा प्रवास आता लवकरच संपणार आहे. या शोला लवकरच विनर मिळणार आहे. बिग बॉसच्या घरामध्ये राहिलेले प्रत्येक स्पर्धक शोचा विनर होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अशामध्ये घरामध्ये उरलेल्या सदस्यांमध्ये भांडणं होताना दिसत आहेत.

बिग बॉस 17 च्या घरातील सर्वांचे लाडके कपल अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्यामध्ये पुन्हा खटके उडाले आहेत. अंकिता आणि विकीमध्ये भांडण झाले आहे. बिग बॉस 17 च्या नुकताच समोर आलेल्या प्रोमो व्हिडीओमध्ये हे दिसत असून सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन या पॉवरफुल कपलने 'बिग बॉस सीझन 17'च्या घरामध्ये एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासून या कपलमध्ये वारंवार वाद होताना दिसत आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांच्यामध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहेत. सतत त्यांच्यामध्ये रुसवे-फुगवे पाहायला मिळत आहेत. या शोमध्ये आल्यानंतर अंकिता आणि विकीने अनेकदा सोडून जाण्याची, लग्न मोडण्याची भाषा केली आहे. आता या शोच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देखील या दोन्ही कपलमध्ये वाद होताना दिसत आहेत. आता पुन्हा त्यांच्यामध्ये खटके उडाले. त्यानंतर अंकिता ढसाढसा रडते.

नॉमिनेशननंतर अंकिता लोखंडे-ईशा मालवीय यांची मनारा चोप्रासोबत जोरदार भांडण होते. नंतर ईशा आणि अंकिता मनाराला चुकीचे ठरवतात. त्यानंतर दोघीही गार्डन एरिायमध्ये बसतात आणि पुन्हा मनाराबद्दल बोलतात. यामुळे विकी चिडतो. विकी त्यांना म्हणतो की सतत मनाराबद्दल बोलणं बंद करा. विकीने मनाराची बाजू घेतल्यानंतर अंकिताला खूप राग येतो. त्यावेळी

ईशा मालवीय विकी जैनला मनारा कुठे चुकीचे आहे हे समजावून सांगते. अंकिताही वेळोवेळी तिचे मुद्दे मांडते. पण ईशा आणि विकी दोघांनीही तिच्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी अंकिता पुन्हा विकीला तिचा मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. पण विकी आणि ईशा हसतात. ही गोष्ट अंकिताला खटकते. त्यानंतर ती चिडून तिच्या रूममध्ये निघून जाते आणि ढसाढसा रडू लागते.

विकी जैन आणि ईशा दोघेही अंकिता लोखंडेला समजावण्यासाठी जातात. विकी अंकिताला विचारतो की, 'तू ओव्हर रिऍक्ट का करत आहेस? एवढी ओव्हर रिऍक्शन का?' अंकिता म्हणते, 'ईशा नाही, तू मला एकटे सोडलेस. विकी, तू माझ्या मागे हसतोस आणि माझा आत्मविश्वास कमी झाला आहे. तुम्ही दोघे बोलता आणि मी माझा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तू माझ्या मागे हसतोस. मी चुकीची आहे जिच्यासोबत तू लग्न केले आहे.'

अंकिता लोखंडे पुढे म्हणते की, 'तुझ्यामुळे मला खूप अपमानास्पद वाटतंय. मी बोलू शकत नाही कारण मला तुमची भीती वाटते. प्रत्येक ठिकाणी थांबवतो आणि अडवतो. मी सर्वकाही बॅलेंस करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून आपली भांडणं होऊन नये पण तू ...' अंकिताला समजवण्याऐवजी विकी स्वतःचा बचाव करू लागतो. अंकिता पुढे म्हणते की, 'तू बोलण्यात खूप चांगला आहे आणि जेव्हा मी माझे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तू टोमणा मारतो.' अंकिता ईशा आणि विकीला सुपर स्मार्ट म्हणते आणि त्यांना निघून जायला सांगते. विकी तिथून निघून जातो. अंकिता ईशाला सांगते की माझा नवरा माझी किंमत करत नाही. अंकिता म्हणाली, 'मला या घरामध्ये मस्करीत घेतलं जात आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

Green Chili Pickle: गावरान पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं, वर्षानुवर्षे टिकून राहील चव

Maharashtra Live News Update : महात्मा फुलेवाडा आमच्या ताब्यात द्या; राज्य सरकारला समता परिषदेचे पत्र

Shocking : लग्नाला सुट्टी मिळाली नाही; लग्नाच्या एक दिवसाआधी ऑडिटरने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT