'Bigg Boss 17' चा ग्रँड फिनाले कधी होणार?, विजेत्याला मिळणार इतकी रक्कम?; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Bigg Boss 17 Latest News: या शोबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. यावेळेस या शोला मागील सीझनप्रमाणे एक्स्टेंशन नसेल. याची घोषणा खुद्द सलमान खानने (Salman Khan) केली होती.
Bigg Boss 17
Bigg Boss 17 Twitter @BiggBoss_Tak
Published On

Bigg Boss 17 Grand Finale:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या शोचा तीन महिन्यांचा प्रवास आता लवकरच संपणार आहे. या शोला लवकरच विनर मिळणार आहे. बिग बॉस 17 चा विनर कोण होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. तर दुसरीकडे घरातील सदस्य देखील या शोची ट्रॉफी जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत.

या शोचा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. याचदरम्यान या शोबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. यावेळेस या शोला मागील सीझनप्रमाणे एक्स्टेंशन नसेल. याची घोषणा खुद्द सलमान खानने (Salman Khan) केली होती. या शोचा ग्रँड फिनाले कधी आणि किती वाजता होणार, त्याचसोबत शोच्या विनरला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

कोणत्या तारखेला आणि किती वाजता?

बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले 28 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या शोचा शेवटचा भाग रविवारी कलर्स चॅनेलवर प्रसारित होणार आहे. या शोचा शेवटचा भाग रात्री ९ वाजता प्रसारित होईल. जर तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर फिनाले पहायचा असेल. तर तुम्ही रात्री ९ वाजता जिओ सिनेमावर लाईव्ह स्ट्रीम पाहू शकता.

बिग बॉस 17 चे टॉप स्पर्धक -

बिग बॉस 17 या शोच्या टॉप स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर, या लिस्टमध्ये अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, आयशा खान, ईशा मालवीय, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी यांचा समावेश आहे. बिग बॉस 17 या शोमध्ये समर्थ जुरेल, जिग्ना वोरा, सना रईस खान, औरा, नील भट्ट, रिंकू धवन, ऐश्वर्या शर्मा, खानजादी, सनी आर्या हे सदस्य देखील होते. पण ते या घरातून बाहेर पडले. आता उरलेल्या टॉप ८ सदस्यांमधून एक जण विनर होणार आहे.

Bigg Boss 17
Sushmita Sen: -1 डिग्री सेल्सिअस तापमान..., सुष्मिता सेनने स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारत लावली आग, VIDEO व्हायरल

विजेत्याला मिळणार इतकी रक्कम?

बिग बॉस 17 या शोच्या बक्षीस रकमेबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण Siasatने स्त्रोताचा हवाला देत लिहिले की, 'या सीझनची बक्षीस रक्कम 30 ते 40 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. याबाबत फक्त चर्चा सुरू आहेत.

Bigg Boss 17
Prithvik Pratap: स्वप्नांपासून… सत्यापर्यंत..! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची आईसाठी खास पोस्ट, म्हणाला - 'हार नाही मानणार…'

सध्या काय चाललंय बिग बॉसमध्ये?

बिग बॉसच्या घरामध्ये असलेले सर्व स्पर्धक आपले सर्वोत्तम प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी शोमध्ये खेळापेक्षा वैयक्तिक आयुष्याबाबत जास्त गदारोळ झाला. ईशा मलावीयाचा बॉयफ्रेंड समर्थ जुरेल याला शोमधून बाहेर जावे लागले. आता शोमध्ये नॉमिनेशन टास्क दाखवण्यात आले होते. या टास्कमुळे स्पर्धकांमध्ये जबरदस्त झुंज पाहायला मिळाली. बिग बॉसने एक टॉर्चर टास्क दिला होता. त्यामुळे विकी आणि मुनव्वर यांच्यातील भांडण हाणामारीपर्यंत पोहोचले. त्याचबरोबर अंकिता आणि मुनव्वर यांच्यातील मैत्रीही तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. अखेर अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, विकी जैन आणि आयेशा खान यांना नॉमिनेट करण्यात आले.

Bigg Boss 17
Sonu Sood Deepfake: सोनू सूदचा डीपफेक व्हिडीओ होतोय व्हायरल, अभिनेत्याने चाहत्यांना सावध राहण्याचं केलं आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com