Bigg Boss 17 Ankita Lokhande Highest Paid Contestant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Most Expensive Contestant: अंकिता लोखंडे ठरली बिग बॉसची सर्वात महागडी स्पर्धक, एका आठवड्याचं मानधन ऐकूण व्हाल हैराण...

Bigg Boss 17 In Ankita Lokhande: यंदाच्या सीझनची सर्वात महागडी स्पर्धक कोण? याबद्दलची माहिती सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Ankita Lokhande Highest Paid Contestant

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय असणारा बिग बॉस हिंदीचा १७ वा सीझन (Bigg Boss-17) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसचे चाहतेही ‘बिग बॉस १७’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १५ ऑक्टोबरपासून कलर्स टिव्हीवर हा शो टेलिकास्ट होणार आहे. शो सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून सध्या सोशल मीडियावर स्पर्धकांची प्रचंड चर्चा सुरु आहे. या सीझनबद्दल दिवसेंदिवस अनेक अपडेट्स प्रेक्षकांच्या समोर येत आहेत.

यंदाच्या सीझनची सर्वात महागडी स्पर्धक कोण? याबद्दलची माहिती नुकतंच सोशल मीडियावर चाहत्यांच्या समोर आली आहे. ‘बिग बॉस १७’ ची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. शोचा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. आता प्रोमोनंतर सर्वांनाच उत्सुकता लागली ती स्पर्धकांची. सध्या अनेकांची स्पर्धक म्हणून नावे तुफान चर्चेत आहे. आता कोण कोण स्पर्धक सहभागी होणार?, याचे उत्तर आपल्याला १५ ऑक्टोबर रोजीच मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन दोघेही ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसणार आहेत.

अंकिताने बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी तब्बल २०० आउटफिट्स खरेदी केल्याची चर्चा आहे. अंकिता आणि तिचा पती शोमध्ये एकही आउटफिट परत घालणार नसल्याचीही सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यातच आता अंकिता घरातील सर्वात महागडी स्पर्धक असल्याचे म्हटले जात आहे. अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’च्या सीझनमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. पण अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Serial)

अंकिता ही बिग बॉसची महागडी सदस्य आहे, अशी सध्या चर्चा होतेय. अंकिता ‘बिग बॉस १७’मध्ये एका आठवड्यासाठी १० ते १२ लाख रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. अंकितासोबत तिचा नवरा विकी जैनही या शोमध्ये सहभागी होणार आहे. तिचा पती विकी जैनने शोसाठी किती मानधन घेतले आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची दीड किलोमीटर लांब रांग; Video

ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा

Voter List Scam: मतदारयांद्यामधील घोळावरुन विरोधक बरसले, निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

SCROLL FOR NEXT