Aishwarya Sharma And Neil Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17'ची ऐश्वर्या शर्मा नेटिझन्सच्या निशाण्यावर, अभिनेत्री का होतेय ट्रोल?

Aishwarya Sharma Angry On Neil Bhatt: नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यात जोरदार भांडणं झाले आहे. हे कपल पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये भांडण करताना दिसले आहे.

Priya More

Aishwarya Sharma And Neil Bhatt:

बिग बॉस 17 (Bigg Boss 17) हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले कंटेस्टंट घरामध्ये एन्ट्री केल्यापासूनच भांडण करत आहेत. रोज नवनवीन कारणांमुळे त्यांच्यात भांडण होत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) आणि नील भट्ट (Neil Bhatt) या नवरा-बायकोने सोबत एन्ट्री केली. या कपलमध्ये देखील जोरदार भांडण झाले आहे. नीलवर संतप्त होत ऐश्वर्याने त्याला धमकी दिली आहे.

नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यात जोरदार भांडणं झाले आहे. हे कपल पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये भांडण करताना दिसले आहे. यादरम्यान ऐश्वर्याने तिचा पती नील भट्टची इमेज खराब केली. नॅशनल टीव्हीवर दोघांना अशा प्रकारे भांडताना पाहून नेटिझन्स प्रचंड संतापले आहेत. सगळेच ऐश्वर्यावर टीका करत आहेत.

अभिषेक कुमार आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यामध्ये काही कारणांवरून वाद होतो. याचदरम्यान नीलला खूप राग येतो. त्यामुळे अभिषेक आणि त्याच्यामध्ये याच मुद्द्यावरून वाद होता. दोघे समोरा-समोर उभं राहून जोरजोरात भांडू लागतात. यावेळी अभिषेक नीलला म्हणतो तू मध्ये येऊ नको. तू भांडायला आला आहे. यावेळी ऐश्वर्या नील आणि अभिषेकला बाजूला करण्याचा प्रयत्न करते. पण दोघांचे भांडण खूपच वाढते.

भांडणानंतर ऐश्वर्या एका ठिकाणी जाऊन बसते. तर नील तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत तिला शांत राहण्यास सांगतो. तर ऐश्वर्या त्याला दूर राहण्यास सांगते. ती बोलते की, मला शांत करू नको, मला बोलू दे. तर नील तिला म्हणतो की, मी तुझ्यासाठी हे सर्व करत आहे. तू ऐवढी रागवली तर तुझी तब्येत खराब होईल.

ऐश्वर्या परत त्याला बोलते की, मी स्वत:ची काळजी घेऊ शकते. ९ वर्षे मी एकटी होती तेव्हा मी स्वत:ची काळजी घेतली. तेव्हा कोणाचीही गरज पडली नाही. तुला माहिती आहे की बाहेर माझ्यासोबत काय-काय झालं होतं. त्यामुळे मी स्वत:ला सांभाळू शकते. मी स्ट्राँग आहे आणि मला कोणाची गरज नाही.

बिग बॉस 17 मध्ये ऐश्वर्या शर्माला पतीसोबत असे बोलताना पाहून नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी ऐश्वर्याला फटकारले आहे. एका यूजरने लिहिले की, 'कोणी तरी ऐश्वर्याला तिच्या पतीचा आदर करायला शिकवा.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'ही नशेत आहे. कुठेपण उभं राहून ती वाद घालते. हिला मदतीची गरज आहे. नीलची किती मजबुरी असावी.' त्याचप्रमाणे तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'ऐश्वर्या शर्माने नील भट्टचा अपमान केला आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा असा आदर करता का? हे आपल्या संस्कृतीत कधीच दिसले नाही. मोठ्या लोकांसाठी हा वेगळा सन्मान आहे.' याशिवाय अनेकांनी ऐश्वर्याला या सीझनची व्हॅम्प म्हणून टॅग केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT