Kapil Patil News: काँग्रेससारखी संस्कृती भाजपची नाही; मंत्री कपिल पाटील यांचा नाना पटोलेंना टोला

Bhiwandi News : काँग्रेससारखी संस्कृती भाजपची नाही, जबाबदारी वाटून दिली जाते; मंत्री कपिल पाटील यांचा नाना पटोलेंना टोला
Kapil Patil Nana Patole
Kapil Patil Nana PatoleSaam tv
Published On

फय्याज शेख

भिवंडी : नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते आहेत का? त्यांना वास्तविकता काय माहिती; असे सांगत काँग्रेसच्या (Bhiwandi) संस्कृतीमध्ये जे चालतं ते भाजपामध्ये चालत नाही. भाजपमध्ये जबाबदारी वाटून दिली जाते; असा टोला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी नाना पटोले यांना लगावला आहे. (Live Marathi News)

Kapil Patil Nana Patole
Cotton Crop: लाल्या रोगामुळे कापसाच्या उत्पादनात घट; दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे संकट

दोन दिवसांपूर्वी नाना पटोले भिवंडीत आले असता त्यांनी कपिल पाटील हे नावापुरते राज्यमंत्री असून सर्व कारभार प्रधानमंत्री कार्यालयातील चालतो असा आरोप केला होता. त्यावर विचारले असता कपिल पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना पटोलेंवर निशाणा साधला. नाना पटोले यांना विसर पडला असेल ही (BJP) भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. देशात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून मोदींची टीम म्हणून मंत्रिमंडळाला संबोधले जाते; असे शेवटी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले

Kapil Patil Nana Patole
Manmad News: विंचूरला कांदा व्यापाऱ्यांचा रस्ता रोको; कांदा व्यापाऱ्याने अपशब्द वापरल्याचा निषेध

काँग्रेस काळात मनमोहन सिंग यांनी घेतलेले निर्णय राहुल गांधी फेडायचे ही काँग्रेसची संस्कृती आहे. भाजपची तशी संस्कृती नाही असे निक्षून सांगत कपिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसात मंत्री परिषदेच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यमंत्र्यांना काम वाटून द्या. त्यांच्या कार्यालयाकडून फाईल्स आल्या पाहिजेत अशा सूचना कॅबिनेट मंत्री यांना दिल्या आहेत. प्रधानमंत्री पीएमओ मधून देशाचा कारभार चालवतात आणि देशाचा कारभार उत्तम चालववात म्हणून ते विश्वाचे नेते झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com