Tina Datta Had Fight With Shiv Thakare Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: टीना दत्ताला अश्रू अनावर; शिव ठाकरेला म्हणाली, "तुझ्यापेक्षा शत्रू बरे"

'बिग बॉस 16'च्या शेवटच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी मिळवण्यासाठी बराच राडा झाला.

Pooja Dange

Bigg Boss 16 Episode Update: 'बिग बॉस १६ हा एक वादग्रस्त असला तरी लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. त्यामुळे या शोमध्ये काय प्रेसक्षक नेहमीच उत्सुक असतात. 'बिग बॉस 16'च्या शेवटच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी मिळवण्यासाठी बराच राडा झाला होता. बिग बॉसने घराचा राजा शिव ठाकरे याला पुढचा कॅप्टन कोण होणार असा विचारले. शिव ठाकरे याने क्षणाचाही विलंब न करता निमृत कौर अहलुवालियाचे नाव घेतले होते. टीना दत्ता खूप दिवसांपासून कॅप्टन बनण्याची इच्छा व्यक्त करत होती आणि शिवने टीनाचे नाव न घेतल्याने ती संतापली.

टीना दत्ताचा वाढदिवस आदल्या दिवशीच होता. वाढदिवसाच्या दिवशीच तिचे तिच्या जवळच्या स्पर्धकांसोबत भांडण झाले. टीना दत्ता, निमृत आणि शिव यांच्यात चुरशीची लढत आहे. शिव तिने कर्णधार बनू नये यासाठी वारंवार टोमणे मारत होता. तसेच वाढदिवसाचे गिफ्ट देण्याविषयी बोलत होता. शिव तिला डिअर असेही म्हणत होता. त्यावर टीनाने शिवला म्हणाली की, तिला डिअर म्हणू नको, तिला अस्वस्थ वाटत . तसेच तू तुझ्या आईला जाऊन बोल. यासोबतच टीनाने तिची सगळ्यांनी केलेल्या मस्करीवर प्रश्नही उपस्थित केले. (TV)

शिवसोबत भांडण झाल्यानंतर टीना दत्ताने शालिन भानोतशी संवाद साधला. सकाळपासून कोणी विचारायला आले नाही याचे तिला वाईट वाटते होते. टीना रडत म्हणाली, “मला कोणी मित्र नाहीत. सकाळपासून एकदाही स्टेन आला नाही आणि मी ठीक आहे की नाही हे सुद्धा विचारले नाही. ज्या व्यक्तीला मी सुरुवातीपासून माझा मित्र मानत होतो. निमृतही एकदाही बोलली नाही. किमान अर्चनाने तरी दिवसातून चार वेळा शुभेच्छा दिल्या. (Bigg Boss)

टीना पुढे म्हणाली, “माझ्या खऱ्या आयुष्यातही हीच समस्या आहे. कोणी प्रेमाने बोलले तर ती व्यक्ती माझी मैत्रीण आहे असे मला वाटते. मी हे कधीच कोणाच्या वाढदिवसाला असं करणार नाही. शिव ज्या प्रकारे मस्करी करत होता. खऱ्या आयुष्यात असे कोणी करत का? मी माझ्या शत्रूलाशी असे करणार नाही. माझ्या मित्राने अगदी बरोबर सांगितले होते की इथे कोणी कोणाचा मित्र नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

INDIA Alliance vs Election Commission:मतचोरीचा वाद टोकाला! इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणणार महाभियोग, काय असते प्रक्रिया?

Maharashtra Rain Live News: सायन पनवेल महामार्गावर मुसळधार पाऊस

Jio Recharge Plan: जिओचा ९० दिवसांचा किफायतशीर प्लॅन, यूजर्संना मिळालं अमर्यादित डेटा

Tejaswini Lonari: गुलाबी साडी अन् लाली लाल लाल...; पिंक फ्लोरल साडी मधला तेजस्विनीचा मनमोहक लूक

Beed News : मध्यरात्री पावसाच जोर वाढला, परळीत कार पुराच्या पाण्यात गेली वाहून, पाहा थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT