Shiv Thakare Bigg Boss 16  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: ग्रँड फिनाले आधीच शिव ठाकरेची घरातून उचलबांगडी, करण जोहरने दिला इशारा?

फिनालेमध्ये कोण पोहोचणार आणि त्याआधी कोण घराबाहेर पडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 16 Elimination This Week Update: सध्या 'बिग बॉस 16' अंतिम टप्प्यात आला असून शोच्या फिनालेसाठी अवघे काही दिवसच आता शिल्लक राहिले आहे. दरम्यान, फिनालेमध्ये कोण पोहोचणार आणि त्याआधी कोण घराबाहेर पडणार हे जाणून घेण्यासाठी सर्वांनाच कमालीची उत्सुकता आहे.

दरम्यान, शोच्या फिनालेपूर्वी शिव ठाकरे घराबाहेर पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. इतकंच नाही तर काही दिवसांपुर्वी करण जोहरने शिव ठाकरेला एलिमिनेट करण्याचा इशारा ही दिला होता.

आजच्या भागामध्ये करण जोहर एकमेकांच्या बॉन्डिंगबद्दल स्पर्धकांशी संवाद साधणार आहे. यावेळी करण जोहर सुंबूल तौकीर खानलाही तिच्या वागणुकीमुळे सोबतच शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनला नॉमिनेट का करण्यात आले याचे कारण स्पष्ट करायला सांगणार आहे.

आजच्या भागात, करण स्पर्धकांना देखील प्रश्न करणार आहे की ते खरोखर चांगले मित्र आहेत की ते फक्त पैशांसाठी एकत्र आहेत? या सर्वांवर प्रश्न विचारत शिव म्हणतो, “घरातील एका सदस्याने चूक केली तर त्याला सर्व सदस्य समजावून सांगतात, कारण ते खूप दिवसांपासून एकत्र आहेत.” त्याचवेळी करण शिवला आणखी एक प्रश्न विचारतो, “जर घरातील एक सदस्य तुटला तर त्याला जबाबदार कोण असेल?”

यासोबतच निमृत कौरनेही शोमध्ये करण जोहरला प्रत्युत्तर देत म्हणाली की, हे स्पर्धक कधीही तुटणार नाहीत. निमृतच्या या उत्तरावर करण म्हणतो, “आज एक व्यक्ती हे घर सोडून जाईल.”आणि नंतर शिव ठाकरेकडे बोट दाखवत करण म्हणतो की, त्याला सर्वात कमी मते मिळाली आहेत. हे ऐकून शिव बाहेरच्या दरवाजाकडे जातो.

त्यामुळे शिव ठाकरे आता घरातून बाहेर जाण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जात आहे. मात्र, शिव ठाकरेच्या एक्झिटला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT