Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराचा लग्न मंडप सजला! शाहरुखचा बॉडीगार्ड घेतोय सोहळ्याच्या सुरक्षिततेची विशेष काळजी

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी शाहरुख खानच्या बॉडीगार्डकडे देण्यात आली आहे.
Siddharth Malhotra Wedding Security
Siddharth Malhotra Wedding SecuritySAAM TV

Sidharth-Kiara Wedding Security: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. लवकरच दोघेही आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात हाती घेणार आहेत. सिड-कियारा 6 फेब्रुवारीला लग्न बंधनात अडणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये या दोघांचा शाही सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बॉलिवूडच्या या लोकप्रिय जोडप्याच्या लग्नाची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे, मात्र या दोघांकडून या बातमीवर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. या दोघांच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी शाहरुख खानचा जुना अंगरक्षक यासिन युगलकडे देण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा एक्स बॉडीगार्ड यासिन सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहे. दोघांच्या लग्नाला खास पाहुणे येणार आहेत. पाहुण्यांच्या यादीत बॉलिवूडमधील अनेक बड्या नावांचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर, मीरा राजपूतसह अनेक सेलिब्रिटी 3 फेब्रुवारीला जैसलमेरला पोहोचण्याची शक्यता आहे.

Siddharth Malhotra Wedding Security
Sidharth And Kiara Wedding: अखेर ठरलं, सिद्धार्थ- कियारा ६ फेब्रुवारीला घेणार सात फेरे, पापाराझींनीच केला खुलासा

सिद्धार्थ-कियारा जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. हा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लग्नाच्या सर्व कार्यक्रमांच्या व्यवस्थापनासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. लग्नाच्या तयारीसाठी सुरक्षा रक्षक आणि अंगरक्षकांची तुकडी 3 फेब्रुवारीला म्हणजेच आज जैसलमेरला जाणार आहे.

अहवालात पुढे म्हटले आहे की, लग्नसोहळ्याची सुरुवात 5 फेब्रुवारीला संगीत सोहळ्याने होईल, त्यानंतर 6 फेब्रुवारीला लग्न होईल आणि त्यानंतर 7 फेब्रुवारीला रिसेप्शन होईल. पाहुण्यांना वधू-वरांकडून मोफत भेटवस्तूही दिल्या जाणार असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. यासोबतच पाहुण्यांसाठी वाळवंट सफारी टूरसारख्या अनेक मनोरंजक कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि ते स्पा व्हाउचरचाही आनंद घेऊ शकणार आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राचा ​​नुकताच 'मिशन मजनू' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.अभिनेता लवकरच इंडियन पोलिस फोर्स या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीने याचे दिग्दर्शन केले असून वेबसीरीजचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हार 'योद्धा' या अॅक्शन थ्रिलरमध्येही सिद्धार्थ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, कियारा अडवाणीबद्दल बोलायचे तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत काम करणार आहे.

सिद्धार्थ लवकरच इंडियन पोलिस फोर्स या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीने याचे दिग्दर्शन केले असून मालिकेचे शूटिंग पूर्ण झाले आहे. 'योद्धा' या अॅक्शन थ्रिलरमध्येही सिद्धार्थ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, कियारा अडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com