Abdu Rozik SAAM TV
मनोरंजन बातम्या

Abdu Rozik : 'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकवर चोरीचा आरोप, दुबईत केली अटक

Abdu Rozik Arrested In Dubai : 'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकला दुबईत अटक करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसमुळे (Bigg Boss 16 ) प्रसिद्ध झालेला गायक अब्दु रोजिक कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या गाण्याचे चाहते दिवाने आहेत. मात्र आता त्याच्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. अब्दु रोजिकला अटक करण्यात आली आहे. ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

गायक अब्दु रोजिकला (Abdu Rozik) दुबई (Dubai ) आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अब्दु रोजिकवर चोरीचा आरोप (Allegations Of Theft ) करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. वीकेंडला शनिवारी पहाटे 5 वाजता मॉन्टेनेग्रोहून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी अब्दु रोजिक ताब्यात घेतले आहे.

अब्दु रोजिकच्या टीमने देखील अब्दुला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्याता खुलासा केला आहे. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे.

वर्कफ्रंट

अब्दु रोजिक हा 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाला होता. आपल्या हटके स्टाइलने त्याने प्रेक्षकांचे आणि घरातील सदस्यांचे मन जिंकले. 21 वर्षांच्या अब्दु रोजिक आपल्या कामाने इंडस्ट्रीत मोठी उंची गाठली आहे.

अब्दु अनेक वर्षांपासून दुबईमध्ये राहत आहे. त्याची अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यापूर्वी देखील अब्दु रोजिक अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलिकडेच अब्दु रोजिक 'लाफ्टर शेफ्स 2'मध्ये पाहायला मिळाला. त्याच्या आगामी प्रोजेक्टची चाहते वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT