Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: निक्की-अरबाजच्या भांडणानंतर बिग बॉसच्या घरात ब्रेकअपची अंताक्षरी; सदस्यांनी दोघांनाही चिडवलं, पाहा VIDEO

Big Boss Marathi 5 New Promo: बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून राडे पाहायला मिळत आहेत. प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्य ब्रेकअपची अंताक्षरी खेळताना दिसणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मरठीच्या नव्या सीझनला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये मस्ती आणि राडे पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांमध्ये घरातील ग्रुप्समध्ये भांडण पाहायला मिळालं होतं. तर अशाच राड्यांमुळे रितेश देशमुखने निक्कीला तुरंगात टाकण्याचा इशारा दिला होता. तसेच बिग बॉसने तुरुंगात टाकलं होतं ज्यामुळे जान्हवीची तबयेत खालवली होती.

त्यानंतर बिग बॉसकडून घरातील सदस्यांना घाबरवण्यात आले होते. या आठवड्यासाठी घरातील सदस्यांच्या जोड्या बनवण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी सुद्धा सदस्यांमध्ये वाद भांडणं होत हेती. यात अरबाज आणि निक्कीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्या आहे. बिग बॉसने अभिजीत आणि निक्कीची जोडी बनवणं हे अरबाजला आवडलं नाही. अभिजीत आणि निक्कीची जोडी बनवल्यामुळे अरबाज नाराज झाला आणि त्याचे निक्कीसोबत वाद झाले.

बिग बॉसच्या नविन प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सर्व सदस्य "ठूकराके मेरा प्यार"हे गाणं गाताना दिसत आहेत. अरबाज आणि निक्कीला चिडवण्यासाठी सदस्य हे गाणं घाताना प्रोमोमध्ये दिसत आहेत. सदस्यांचं हे गाणं ऐकल्यावर निक्कीनं तिच्या अंदाजात "बाई...." असं म्हणत त्यावर रिअॅशन दिले आहे. त्यानंतर आर्या आणि सर्व सदस्य "मुझे छोडकर.... बडा पचताओ गे..." हे गणं सुद्धा गाताना दिसत आहेत. आजच्या भागामध्ये सर्व सदस्य ब्रेकअपचे गाणी गावून अरबाज आणि निक्कीला चिडवताना दिवचताना आहेत. सदस्यांच्या या कृतीमुळे अरबाज आणि निक्की पुन्हा एकदा बोलणार का? की त्यांच्यातील भांडण आनकी वाढणार हे पाहाणं रंजक ठरेल.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनने कलर्स मराठीवरील सर्व मालिकांना TRPच्या रेटींगमध्ये मागे टाकले आहे. बिग बॉस मराठीमधील रितेश देशमुखच्या होस्टींगला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर रितेश घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसतो. त्यासोबतच आठवड्यातील सर्व घडामोडींचा आढावा देखील तो घेत असतो.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT