Jahnavi Killekar Video : अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या पुष्पा २ या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी पासूनच जोरदार चर्चा सुरु होती. सोशल मीडियावर सगळीकडे याच चित्रपटाबद्दल बोलले जात आहे. या चित्रपटातील गाणी किंवा डायलॉग देखील प्रत्येक तरुणाच्या ओठावर आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीपासूनच या चित्रपटातील गाण्यांवर रील व्हायरल होत होत्या. आता बिग बोस फेम जान्हवी किल्लेदार आणि छोटा पुढारी घन:श्याम दरवडे या दोघांनी देखील या चित्रपटाच्या गाण्यावर एक भन्नाट रील केली आहे. जी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.
‘बिग बॉस मराठी’चे पाचव सिझन संपून दोन महिने पूर्ण झाले तरीही त्यातील स्पर्धक हे आजही चर्चेत आहेत. याच बिग बॉसमधील किल्लर गर्ल जान्हवी किल्लेकरने छोटा पुढारी घन:श्याम दरवडे आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांची पुष्पा २ या चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर केलेली मजेशीर रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तिघांच्या या विनोदी रीलला चाहते देखील भरभरून प्रेम देत आहेत.
जान्हवी किल्लेकर, घनःश्याम दरवडे आणि अक्षय वाघमारे यांच्या मजेशीर रील व्हिडीओवर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “एक नंबर रील बनवली आहे. आम्हाला खूप आवाडली.” तसंच दुसऱ्याने लिहिले की, “नको गं…तो लहान आहे.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, बिचार घनःश्याम अशा अनेक विनोदी प्रतिक्रिया चाहते या रिलवर देत आहे.
दरम्यान, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाणं चित्रपट प्रदर्शनाआधीच सुपरहिट झाल आहे. हे गाण प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने गायले आहे. तर रकीब आलम यांनी लिहिलं असून देवी श्री प्रसादने संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यातील हूकस्टेप प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली असून अनेक कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने या गाण्यावर त्यांच्या स्टाईलने जबरदस्त रील व्हिडीओ बनवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.