Oscar 2025 : ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर; आता 'या' चित्रपटाकडून भारताला अपेक्षा

Oscar 2025 : 'लापता लेडीज' ९७व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर आहे. 'लापता लेडीज' हा कमी बजेटचा चित्रपट यावर्षी १ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने जगभरात 25 कोटींची कमाई केली.
Laapataa Ladies
Laapataa LadiesSaam Tv
Published On

Oscar 2025 : आमिर खान निर्मित 'लापता लेडीज' हा चित्रपट ९७ व्या ऑस्कर पुरस्कारच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) ने बुधवारी सकाळी ही घोषणा केली. २०२४ साली भारतात सर्वाधिक पसंतीचा चित्रपट ठरलेल्या या चित्रपटाला शेवटच्या १५ चित्रपटांच्या यादीतही स्थान मिळाले नाही. या बातमीनंतर भारतीय चाहते थोडे निराश झाले आहेत.

'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी 'संतोष' हा चित्रपट शेवटच्या १५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. संतोष हा चित्रपट ब्रिटीश-भारतीय दिग्दर्शक संध्या यांनी दिग्दर्शन केले आहे. ब्रिटिश अकादमीने ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी यूकेकडून संतोष हा चित्रपट पाठवला होता. हा चित्रपट हिंदी भाषेत चित्रीत केलेला आहे. यात शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत आहे. सुनीता राजवार, संजय बिश्नोई, कुशल दुबे आणि इतर कलाकारांनी या सिनेमात सहायक भूमिका केल्या आहेत.

Laapataa Ladies
Shivani Sonar Wedding: प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सोनार अडकणार लग्नबंधनात; कोण आहे तिचा होणारा नवरा?

‘अनुजा’ झाली शॉर्टलिस्ट

‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी गुनीत मोंगा कपूर निर्मित लाइव्ह-ॲक्शन शॉर्ट फिल्म ‘अनुजा’ शॉर्टलिस्ट झाली आहे. ही शॉर्ट फिल्म वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करते. यामध्ये नागेश भोसलेसह अनेक कलाकार आहेत.

Laapataa Ladies
krrish 4 : प्रियांका अन् कंगनाला बाजूला सारून 'क्रिश ४'मध्ये 'या' अभिनेत्रीची वर्णी? स्वतः दिली हिंट

ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्चला

‘लपता लेडीज’ हा चित्रपट परदेशी श्रेणीतील पुरस्कारासाठी पाठवण्यात आला होता. २३ सप्टेंबर रोजी, फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्कर २०२५ साठी या चित्रपटाला पाठवण्याची घोषणा केली होती. ऑस्कर पुरस्कारासाठीची नामांकने १७ जानेवारीला जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर ऑस्कर पुरस्कार सोहळा २ मार्चला होणार आहे.

आत्तापर्यंत भारतातून 'मदर इंडिया', 'सलाम बॉम्बे' आणि 'लगान' या तीन चित्रपटांना ऑस्करच्या परदेशी चित्रपट श्रेणीत नामांकन मिळाले आहे, मात्र एकाही चित्रपटाला पुरस्कार मिळू शकला नाही. 'लापता लेडीज'च्या नॉमिनेशननंतर लोकांना वाटले होते की, यावेळी हा पुरस्कार भारतात येईल, पण यावेळीही त्यांना ऑस्करची वाट पाहावी लागणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com