Stree 2  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Stree 2 : श्रद्धाच्या चित्रपटातील खरी 'स्त्री' कोण? चेहऱ्यावरील पदराआड कोणता चेहरा?

Who Play Stree Role : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'स्त्री 2' मधील स्त्रीची भूमिका नक्की कोणी साकार केली? जाणून घ्या सविस्तर

Shreya Maskar

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव ( Rajkummar Rao ) यांचा 'स्त्री 2' (Stree 2) बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. यांनी खूप कमी वेळात मोठी कमाई केली आहे. 2018 साली स्त्रीचा सीक्वेल आला होता. स्त्री बघितल्यापासून प्रेक्षक 'स्त्री 2'ची वाट पाहत होते. या चित्रपटात तुम्ही लाल घुंगट मध्ये दिसणारी 'स्त्री' पाहिली असेल, पण ती नक्की कोण? आज जाणून घेऊयात.

'स्त्री 2' या हटके चित्रपटात यंदा स्त्रीची भूमिका अभिनेत्री भूमी राजगोरने (Bhumi Rajgor) हीने साकारली होती. एका मिडिया मुलाखतीत भूमीने स्त्री 2 अनुभव सांगितला आहे. तिने सांगितलेल्या माहितीनुसार, भूमीने (Bhumi Rajgor) याआधी स्त्री 2 च्या विविध भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण नंतर तिला स्त्रीच्या भूमिकेची ऑफर आली. या भूमिकेसाठी तिची खास पद्धतीने ऑडिशन घेण्यात आली. तिला ऑडिशनमध्ये जीवाच्या आकांताने किंचाळायला सांगितले होते. भूमी या ऑडिशनला तिच्या आयुष्यातली सर्वात कॉमेडी ऑडिशन म्हणून बोलते. यानंतर तिला सांगण्यात आले की, तु भुताच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तुझा चेहरा चित्रपटात कुठेच दिसणार नाही.

या मुलाखतीत तिने श्रद्धा कपूरची (Shraddha Kapoor) स्तुती देखील केली आहे. तिने सांगितले की, श्रद्धा बोलायला खूप छान आहे. मात्र तिला पंकज त्रिपाठींसोबत काम करता आल नाही याची तिने खंत व्यक्त केली. सुरुवातीला भूमीच्या घरचांना ही भूमिका फारशी पटली नव्हती. कारण यात माझी ओळख दिसणार नव्हती. पण इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळणार यातून काहीतरी शिकायला मिळणार यामुळे मी ही भूमिका स्वीकारली. 2018 साली रिलीज झालेल्या 'स्त्री' या चित्रपटात फ्लोरा सैनी हीने स्त्रीची भूमिका केली होती.

भूमी राजगोरने कोणते चित्रपट केले?

अभिनेत्री भूमीने याआधी काही चित्रपटात काम केले आहे. यात सत्यप्रेम की कथा, हरी ओम हरी, फक्त महिलाओं माटे या चित्रपटांचा समावेश आहे. भूमी अभिनय क्षेत्रात येण्याआधी उत्तम मेकअप आर्टिस्ट होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा उद्याच मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

Sharad Pawar Speech : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, मातोश्रींना माहीतच नव्हतं; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

Vaibhav Suryavanshi: वय वर्ष फक्त १३! वैभव सूर्यवंशीवर या संघाने लावली कोटींची बोली

SCROLL FOR NEXT