Bhavya Gandhi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bhavya Gandhi : 'तारक मेहता...'च्या चाहत्यांना मोठा धक्का; ८ वर्षांनंतर टप्पू पुन्हा येणार? भव्य गांधीने केला खुलासा

TMKOC-Bhavya Gandhi : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमधून भव्य गांधी प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला आहे. सध्या भव्य गांधी शोमध्ये पुन्हा येणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. यावर भव्य गांधी नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

भव्य गांधीला 'तारक मेहता...' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली.

भव्य गांधी यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये टपूची भूमिका साकारली होती.

भव्य गांधी 'तारक मेहता...'मध्ये पुन्हा येणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) 2008 पासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या शोने अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली आहे. या शो मधील पात्र प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. दया बेन प्रमाणेच 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील टपू हे पात्र खूप गाजले. शो च्या सुरुवातीला टपूच्या भूमिकेत अभिनेता भव्य गांधी (Bhavya Gandhi) झळकला. मात्र कालांतराने त्याने शोमधून एक्झिट घेतली.

भव्य गांधी याने 2017 ला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो सोडला. त्याच्या अशा अचानक शो सोडल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर भव्य गांधीने चित्रपटामध्ये एन्ट्री घेतली आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आता पुन्हा एकदा भव्य गांधी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मुळे चर्चेत आला आहे. अनेक काळापासून भव्य गांधीची 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो मध्ये एन्ट्री होणार असल्याचे बोले जात आहे. यावर आता भव्य गांधीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भव्य गांधीने नुकत्याच दिलेल्या एका मिडिया मुलाखतीत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोवर भाष्य केले. जेव्हा त्याला शो मध्ये परत यायचं आहे का? असे विचारले गेले. तेव्हा भव्य गांधी म्हणाला की, "हो, का नाही... मला या शोमध्ये परत यायला नक्कीच आवडेल. तो माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला अनुभव असेल. या कार्यक्रमाचे माझ्या करिअरमध्ये मोलाचे स्थान आहे. मी संपूर्ण टीमचे आभारी आहे. "

भव्य गांधी 'तारक मेहता...' मानधनाविषयी म्हणाला की, "मला त्यावेळी माहित नव्हतं की, शोसाठी किती पैसे असतात. मी लहान होतो. त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार आई-बाबा पाहायचे. मला अभिनय क्षेत्रात काहीतरी वेगळे करायचे होते, त्यामुळे मी शो सोडला आणि गुजराती चित्रपटांकडे वळलो." 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील भव्य गांधीच्या कमबॅक बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

Raigad Tala Fort: रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा|Video Viral

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

प्रवासी वाहनांना अडवून लूटमार! सोलापूर–धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित|VIDEO

SCROLL FOR NEXT