Shreya Maskar
कोकणदिवा किल्ला रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. कोकणदिवा किल्ला हा एक डोंगरी किल्ला आहे.
कोकणदिवा किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगेचा भाग आहे. किल्ल्यावरून निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
कोकणदिवा किल्ल्याचा उपयोग रायगड आणि कावळे घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरुज म्हणून केला जात होता. असे बोले जाते.
कोकणदिवा किल्ल्याच्या पायथ्याशी सांदोशी हे गाव वसलेले आहे. येथे तुम्हाला गेल्यावर गावाची आठवण येईल.
कोकणदिवा किल्ल्यावरून भवानी कडा, टकमक टोक आणि रायगडचे सुंदर दृश्य दिसते.
कोकणदिवा किल्ल्यावरून पूर्वेला तोरणा, आग्नेयेला लिंगाणा किल्ला आणि पश्चिमेला कावळ्या घाट दिसतो.
तुम्हाला साधा-सिंपल ट्रेकिंगचा प्लान करायचा असेल तर कोकणदिवा किल्ल्याला हा उत्तम पर्याय असू शकतो. त्यामुळे तुम्ही येथे मित्रमंडळींसोबत पिकनिक प्लान करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.