Solapur : सोलापूरमध्ये १३ वर्षीय मुलाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Solapur 13 Years Old Boy Suicide: सोलापूरमध्ये मोबाईल वापरायला न दिल्याने १३ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना घडली. रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
Solapur 13 Years Old Boy Suicide
Solapur 13 Years Old Boy SuicideSaam Tv
Published On
Summary
  • सोलापूरच्या पेनुर गावात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • मोबाईल वापरावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती

  • रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित

  • पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली

  • कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Solapur 13 years Old Boy Sucide सोलापूरमध्ये १३ वर्षीय मुलाने पालकांनी मोबाईल वापरायला न दिल्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना पुर्वी मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. यशराज धर्मराज डोके ( Yashraj Doke) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे धर्मराज डोके हे कुटुंबासोबत राहून शेती करून उपजीविका करतात. १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी राहत्या घरी यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही? म्हणून स्वतःहून राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास लावून घेतला होता.

Solapur 13 Years Old Boy Suicide
Success Story : १७ हजारात व्यवसाय उभारला, सहा महिन्यात १५ लाखांचा नफा; जयपूरमधील दोन बेस्टफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा

दार आतमधून लॉक असल्याने तो घराची कडी का उघडत नाही? म्हणून कुटुंबीयांनी लोखंडी रॉड घालून कडी तोडली. गळफास घेतलेला दिसला. त्याला तात्काळ पेनुर येथील खाजगी रुग्णालयात व त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

Solapur 13 Years Old Boy Suicide
Afghanistan Pakistan War : पाकिस्तानवर एअरस्ट्राइक! नूर खान बेसवर अफगाणिस्तानचा शक्तिशाली हल्ला, फोटो अन् व्हिडिओ आले समोर

रुग्णालयात पोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृत मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com