Jeetendra : जितेंद्र पायरीवरून पडले; सुरक्षा रक्षक अभिनेत्याला उचलण्यासाठी धावले, VIDEO होतोय व्हायरल

Jeetendra Viral Video : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जितेंद्र तोल जाऊन खाली पडले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.
Jeetendra Viral Video
JeetendraSAAM TV
Published On
Summary

बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जरीन खान यांच्या प्रेयर मीटिंगला जितेंद्र उपस्थित होते.

पायरी चढताना जितेंद्र यांचा तोल गेला आणि ते खाल पडले.

बॉलिवूड अभिनेते जितेंद्र (Jeetendra ) कायम आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. वयाच्या 83 वर्षी ते फिट आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्याचा तोल जाऊन ते खाल पडलेले पाहायला मिळत आहे. नेमकं त्या क्षणी घडले काय, जाणून घेऊयात.

10 नोव्हेंबर सोमवारी संजय खान यांची पत्नी जरीन खान यांची प्रेयर मीटिंग होती. याला बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. ज्यात राणी मुखर्जी, ऋतिक रोशन, सबा आजाद, आलिया गोनी, मलायका अरोरा, हेलन, ईशा देओल, सलीम खान यांसारख्या कलाकारांचा समावेश होता. जरीन खान यांच्या प्रेयर मीटिंगला जितेंद्र यांनी देखील उपस्थिती दाखवली. तेव्हा प्रेयर मीटिंगच्या ठिकाणी जाताना (वेन्यू) दारातच तोल जाऊन जितेंद्र खाली पडले.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जितेंद्र आपल्या कारमधून खाली उतरतात आणि गेटच्या दिशेने चालू लागतात. तेव्हा खाली असलेल्या छोट्या पायरीवर जितेंद्र यांचा पाय अडखळतो. त्यांचा तोल जातो आणि ते खाली पडतात. जितेंद्र खाली पडताच त्यांना उचलण्यासाठी त्यांचे सुरक्षा रक्षक आणि सहकारी पुढे धावतात. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने जितेंद्र उठतात आणि बोलू लागतात.

जितेंद्र यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. चाहते त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत. जरीन खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 81 वर्ष जरीन खान यांनी अखेरचा श्वास घेतला.

Jeetendra Viral Video
Dharmendra : "धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर"; सनी देओलच्या टीमने दिलं अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com