Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची नवी खेळी; जितेंद्र आव्हाड यांचा कट्टर समर्थक फोडला

BjP political news : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपने जितेंद्र आव्हाड यांचा कट्टर समर्थक फोडला. ठाण्यातील माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Maharashtra Political News
Maharashtra PoliticsSaam t
Published On
Summary

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा नवा डाव

जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय, माजी नगरसेवक अमित सरैय्या यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अमित सरैय्या यांचा प्रवेश

पक्ष प्रवेशामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

ठाणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाण्यात मोठी खेळी खेळली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक, माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं.

अमित सरैय्या यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सरैय्या यांना पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपने नवा डाव टाकल्याचे बोलले जात आहे. सरैय्या यांच्या पक्षप्रवेशामुळे वागळे इस्टेट परिसरातील राजकीय समीकरण बदल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Political News
Public Holiday 2025 : ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे की नाही? महत्वाची माहिती आली समोर

अमित सरैय्या यांच्या पक्षप्रवेशामुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. सरैय्या यांचा आज दुपारी चार वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.

Maharashtra Political News
Railway Accident : धावत्या रेल्वेचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू, परिसरात लोकांची धावाधाव

अमित सरैय्या यांनी २०१२ साली सावरकरनगर प्रभागातून निवडणूक लढवून शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारकटक्के यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१७ साली झालेल्या निवडणुकीत सरैय्या यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. तरीही सरैय्या या भागात प्रभावी राजकीय नेते म्हणून ओळखले जातात.

नंदुरबारात शरद पवारांना मोठा धक्का

नंदुरबार जिल्ह्यात भाजपमध्ये अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शहादा तालुक्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपने मोठा धक्का दिलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुळाताई पाडवी यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने भाजमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे नंदूरबारमध्ये आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला मोठं फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com