Bhau Kadam SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bhau Kadam : भाऊ कदमांची लेक अमेरिकेहून भारतात परतली; दादा कोंडकेंच्या गाण्यावर वडिलांसोबत केला भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

Bhau Kadam Dance With Daughter Mrunmayee kadam : भाऊ कदमांनी लेकीसोबत 'हिल पोरी हिला' गाण्यावर भन्नाट डान्स केला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

भाऊ कदम आणि गौतमी पाटीलचे 'हिल पोरी हिला' गाणे सुपरहिट

भाऊ कदमांनी लेकीसोबत केला 'हिल पोरी हिला' गाण्यावर भन्नाट डान्स

भाऊ कदमांची लेक अमेरिकेहून भारतात परतली

सोशल मीडियावर सध्या अभिनेते भाऊ कदम आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांचे 'हिल पोरी हिला' गाणे तुफान गाजत आहे. प्रेक्षक या गाण्यावर भरभरून रील बनवत आहे. तसेच भाऊ कदम आणि गौतमी पाटीलच्या जोडीचे कौतुक करत आहेत. गाणे रिलीज झाल्यावर भाऊ कदम यांच्या लेकीने म्हणजेच कंटेंट क्रिएटर मृण्मयी कदमने एक खास कमेंट केली होती. तिने लिहिलं की, "गाणं खूप आवडलं...एकदम मस्त! या गाण्यावर कधी डान्स करतेय असं झालंय..."

अखेर मृण्मयी कदमने चाहत्यांना एक खास सरप्राइज दिले आहे. मृण्मयी आपल्या शिक्षणासाठी आणि कामानिमित्त अमेरिकेला राहते. पण ती पुन्हा भारतात परतली आहे आणि आपल्या वडीलांसोबत (भाऊ कदम) 'हिल पोरी हिला' या भन्नाट गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत भाऊ कदम आपल्या तिन्ही मुलींसोबत 'हिल पोरी हिला' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. मृण्मयीही भाऊ कदम यांची मोठी लेक आहे.

व्हिडीओत चौघेही 'हिल पोरी हिला' गाण्याच्या हुक स्टेपवर नाचताना दिसत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "सरप्राइज, सरप्राइज...'ओजी' (मूळ कलाकार-भाऊ कदम) सोबतची रील...ती परत आली आहे US ते IN, हिल पोरी हिला..." या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सर्वजण बाप-लेकीच्या जोडीचे कौतुक करताना दिसत आहेत. गाण्यासाठी मृण्मयीने छान पारंपरिक लूक केला आहे. पैठणीचा कुर्ता आणि मोत्याचे दागिने तिने परिधान केले आहेत.

भाऊ कदम आणि गौतमी पाटीलचे 'हिल पोरी हिला' हे गाणे दादा कोंडके यांच्या 'हिल हिल पोरी हिला...' या गाण्याचा सुंदर रिमेक व्हर्जन आहे. हे गाणे दादा कोंडके यांच्या 'आंधळा मारतो डोळा' या चित्रपटातील आहे. 'हिल हिल पोरी हिला...' हे गाणे गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांनी आपल्या सुरेल आवाजात संगीतबद्ध केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits Of Guava : बॅड कोलेस्ट्रॉल वाढलंय? रोज पेरू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल होईल कमी; जाणून घ्या फायदे

Manasi Parekh: नेपाळमधील पूरात अडकली, शेवटी...; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभ

Maharashtra News Live Update: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत FDA ची ‘एन्ट्री’

Sambhajingar: डेटिंग ॲपवर तरुणांना जाळ्यात अडकवायचं, आलिशान बारमध्ये न्यायचं नंतर...; संभाजीनगरमध्ये 'लेडीज गँग'चा पर्दाफाश

धक्कादायक! मंत्री आदिती तटकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT