Bharti Singh Hospitalized Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bharti Singh Hospitalized : कॉमेडियन भारती सिंग रुग्णालयात दाखल; अभिनेत्री करतेय 'या' गंभीर आजाराचा सामना

Bharti Singh News : कॉमेडी क्वीन भारती सिंगची तब्येत बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Chetan Bodke

Bharti Singh Hospitalized

टेलिव्हिजन कॉमेडी क्वीन भारती सिंग कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत असते. भारती नेहमीच इन्स्टाग्रामवर आपल्या फॅमिलीसोबत मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने एक ब्लॉग व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपली हेल्थ अपडेट चाहत्यांना दिलेली आहे. भारती सध्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात ॲडमिट आहे, याबद्दलची माहिती अभिनेत्रीने ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.

भारतीने ब्लॉगमध्ये सांगितले की, "तीन दिवसांपासून माझ्या पोटात दुखत होते. मला फूड इन्फेक्शन झालं आहे, काल रात्रीपासून पोटात संसर्ग वाढला आहे पण आता मी बरी आहे. पित्त मुत्राशयात दगड असून तो व्हेनमध्ये अडकल्याचे समोर आलं." भारतीला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्यासोबतच अभिनेत्रीच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

यावेळी अभिनेत्रीने माझ्यासारखं तुम्ही आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करू नका, असं चाहत्यांना तिने सांगितले. सध्या अभिनेत्रीचा हा ब्लॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांची रांग

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

SCROLL FOR NEXT