Actor Hospitalized Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Hospitalized: 'भाभीजी घर पर हैं'फेम अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक; ICUमध्ये उपचार सुरू, बहिणीची मदतीची मागणी

Actor Hospitalized: 'भाभीजी घर पर हैं' आणि 'एफआयआर' (FIR) सारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेता रुग्णालयात दाखल. कोविडपासून सुरु झाला होता त्रास.

Shruti Vilas Kadam

Actor Hospitalized: 'भाभीजी घर पर हैं' आणि 'एफआयआर' (FIR) सारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता ईश्वर सिंग याच्याबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या बहिणीने सांगितले की, दोन-तीन दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खालावली, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांनी सांगितले की, ईश्वरच्या उपचारांवर त्यांनी आपली सर्व जमा-पुंजी खर्च केली आहे आणि आता त्यांच्याकडे पैसे उरलेले नाहीत. त्यामुळेच त्यांना मदतीचे आवाहन करावे लागत आहे.

२०२० मध्ये पायाला झालेल्या जखमेपासून आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या

'एचटी सिटी'शी (HT City) बोलताना ईश्वरची बहीण जयश्री यांनी सांगितले की, त्याला सुरुवात २०२० मध्ये पायाला झालेल्या दुखापतीपासून झाली. त्या म्हणाल्या, "ईश्वर माझा मोठा भाऊ आहे. कोविड लॉकडाऊनच्या तीन महिने आधी, २०२० मध्ये त्याच्या पायाला एक जखम झाली होती आणि तिथूनच या सर्व समस्या सुरू झाल्या. त्याला डायबिटीज (diabetes) असल्याने ती जखम बरी होऊ शकली नाही आणि आता संसर्ग (infection) संपूर्ण शरीरात पसरला आहे. काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती अधिकच बिघडली, त्यामुळे आम्ही त्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या उपचारांवर आम्ही आमचे सर्व पैसे खर्च केले आहेत; आता आमच्याकडे काहीही उरलेले नाही. म्हणूनच आम्हाला मदतीची गरज आहे."

'भाभीजी घर पर हैं' आणि 'एफआयआर'च्या निर्मात्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला

जयश्री यांच्या म्हणण्यानुसार, 'एफआयआर' आणि 'भाभीजी घर पर हैं' या मालिकांच्या निर्मात्यांनी, तसेच ईश्वरच्या काही सहकलाकारांनी कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. त्या म्हणाल्या, 'एफआयआर' आणि 'भाभीजी घर पर हैं'च्या निर्मात्यांनी शक्य तितकी मदत केली. त्याच्या सहकलाकारांनीही पाठिंबा दिला. कविता कौशिक 'दी' यांनी मदतीचे आवाहन केले होते आणि त्यामुळेच आम्ही आतापर्यंत त्याचे उपचार सुरू ठेवू शकलो आहोत."

५४ वर्षीय अभिनेता

ईश्वरच्याबद्दल सांगायचे तर, ते ५४ वर्षांचे आहेत. ईश्वर अविवाहित असून ते आपली आई आणि धाकट्या बहिणीसोबत राहतात. आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांची आई आणि बहीण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांना शह? 'गोकुळ'नंतर जिल्हा बँकेतही भाजपची तिरकी चालl; माजी खासदाराला गळाला लावण्याचे प्रयत्न

Political News: राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयंकर कृत्य, महापालिका आवारात महिला कर्मचाऱ्याचा हात पकडला अन्...

10 नोव्हेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप? पटेल-पवारांच्या भेटीत विलिनीकरणाची तारीख ठरली?

Diwali For Diabetes Patient: डायबिटीजच्या रूग्णांनी दिवाळीचा फराळ खावा की नाही? रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम

Pune News: सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडाल तर खबरदार, पुणे महानगरपालिकेकडून नियमावली जारी

SCROLL FOR NEXT